Nanded News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका सुरु आहेत. याच निवडणुकांवरुन राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडमध्येही राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत. अशोक चव्हाण यांनीच युती तोडली, युती तुटण्यास तेच 100 टक्के जबाबदार आहेत. असे हेमंत पाटील म्हणाले.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले हेमंत पाटील?

नांदेड जिल्हयात सगळे पक्ष आपल्या मर्जीने चालावे ही अशोक चव्हाण यांची भूमिका आहे. पैशांचा वापर करुन कार्यकर्त्यांची जमात नष्ट करण्याचा त्यांचा जुना प्रयोग असल्याची टीता आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली.  अशोक चव्हाण यांनीच युती तोडली, युती तुटण्यास तेच 100 टक्के जबाबदार आहेत असेही ते म्हणाले. 

एकही जागा देऊ शकत नाही असं अशोक चव्हाण म्हणाले

नांदेडमध्ये शिवसेना भाजपाची युती व्हावी यासाठी, शिवसेनेच्या चारही आमदारांनी प्रमाणिक प्रयत्न केले. तीन आमदार अशोक चव्हाण यांच्या घरी दोनवेळा गेले. प्रत्येक ठिकाणी 20 टक्के जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवला. मात्र, एकही जागा देऊ शकत नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. त्यामुळं युती तुटल्याचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले. युती तुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये मनभेद निर्माण झाले आहेत. मी तिन्ही आमदारांना सांगितलं होतं , लेखी स्वरूपात प्रस्ताव घेऊन जा , कारण लोकांना सुद्धा कळालं असतं खरं खोटं काय? असं हेमंत पाटील म्हणाले.

Continues below advertisement

मी म्हणेल तशाच पद्धतीने सगळ्या पक्षांनी जिल्ह्यात चाललं पाहिजे अशी अशोक चव्हाण यांची भूमिका

जाणीवपूर्वक युती करायची नाही. पैशाचा वापर करून कार्यकर्ता जमात नष्ट करायचा प्रयोग मागील अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यात सुरु असल्याची टीका हेमंत पाटील यांनी केली आहे. मी म्हणेल तशाच पद्धतीने सगळ्या पक्षांनी जिल्ह्यात चाललं पाहिजे, अशी त्यांची सातत्याने भूमिका राहिलेली आहे. युती तुटण्यास 100 टक्के अशोक चव्हाण जबाबदार आहेत. आमचे चार आमदार आहेत. त्यांच्या बरोबरीने आमची देखील ताकद आहे. तरीही आम्ही 20 टक्के जागा मागितल्या होत्या. त्या दिल्या असत्या तर वेगळं चित्र असतं. कार्यकर्त्यांना बळ मिळालं असतं असे हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

आमच्या निवडणुका असतात तेव्हा युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या असतात तेव्हा करायची नाही

आमच्या निवडणुका असतात तेव्हा युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या असतात तेव्हा करायची नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होतात असं हेमंत पाटील म्हणाले. मला त्यांचा अनुभव आहे, नवीन आमदारांना अनुभव नव्हता, आता त्यांना अनुभव आला असे हेमंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

ठाकरे गटाच्या 16 पैकी 11 उमेदवारांची माघार, रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोडी, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप