Nanded: काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या तब्येतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण येत असून अचानक बीपी लो झाल्याने त्यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी एअर ॲब्युलन्सने हैद्राबाद येथे हलवणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
नांदेड लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे खासदार वसंत चव्हाण यांना आज अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. त्यांच्या परिवारातील सदस्याने तात्काळ त्यांना पुढील उच्चारासाठी नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तात्काळ डॉक्टर कृष्णा पाटील यांनी उपचार सुरू केले. सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून पुढील उपचारासाठी खासदार चव्हाण यांना एअर ॲम्बुलन्स द्वारे हैद्राबाद येथील किम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात येणार आहे. नांदेड विमानतळावर एअर ॲम्बुलन्स दाखल झाली असून लवकरच रुग्णालयातून खासदारांना एअर ॲम्बुलन्स ने हैदराबाद येथे हलवले जाणार आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात मागील दोन दशकांपासून प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी वयाच्या सत्तरीत लोकसभा निवडणूक लढवली. आणि निवडूनही आले. खासदार अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर २०२४ च्या लोकसभेत नांदेडची जागा काँग्रेसला मिळवून दिले. नायगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे ते पहिलेच आमदार आहेत.
बातमी अपडेट होत आहे...