Nanded : नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून एका 12 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी पावने सहाच्या सुमारास आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. वैभव पांचाळ अस मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement

विमानातळ पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु

आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेल आणि कोचिंग क्लासेस आहेत. याच हॉस्टेलचा वैभव हा विद्यार्थी होता. तो सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आठ दिवसापूर्वी कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेल येथे दाखल केले होते. आज सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. त्यानंतर तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यावरुन पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे.  या प्रकरणी विमानातळ पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दरम्यान, 12 वर्षाच्या वैभवचा पडून नेमका मृत्यू कसा झाला? याचा अधिकचा तपास पोलिस घेत आहेत. याबाबतची माहिती घेतली जात आहे.  दरम्यान, पायऱ्यावरुन पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं असले तरी पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. 

Continues below advertisement

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातही धक्कादायक घटना

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या रांजण खळगे धबधब्यावर साडेबाराच्या सुमारास आंघोळीचा आनंद घेत असताना 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सॅम राज दुराई असं या मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील कुर्ला परिसरात राहत होता. तो आपल्या पाच मित्रांसह माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. यावेळी ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच NDRF टीम आणि जीव रक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रशासनाने या धबधबा परिसरात पर्यटनासाठी बंदी घातलेली असूनही पर्यटकांचा वावर सातत्याने सुरू आहे. या ठिकाणी यापूर्वीही जवळपास 60 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nanded Crime News: चोर समजून युवकाला अमानुषपणे मारहाण, नेटग्रीड प्रणालीमुळे ओळख पटली पण वेळ निघून गेली; युवकाच्या मृत्यूनंतर चार आरोपींना अटक