Nanded : नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे मराठा ओबीसी वाद पेटला आहे. मराठा आरक्षणा विरोधात जनहित याचिका दाखल करणाऱ्या मनोहर धोंडेच्या संस्थेत मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही, अशी भूमिका रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. यानंतर ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. तर आता मराठा संस्थाचालक असलेल्या शाळेत ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाहीत, अशी भूमिकारिसनगाव येथील ओबीसी समाज बांधवांनी जाहीर केली आहे. मनोहर धोंडे सर यांची लढाई कायदेशीर आहे, असे मत ओबीसी समाजाने व्यक्त केले आहे. 

21  विद्यार्थ्यांचे दाखले मागितले

शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. याला विरोध म्हणून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 21  विद्यार्थ्यांचे दाखले मागितले आहेत. तर आता या विरोधात ओबीसी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाला आहे. ज्या मराठा संस्था आहेत त्या मराठा संस्थेत आम्ही ओबीसी समाजाचे विद्यार्थी शिकवणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घेतलेली भूमिका ही कायदेशीर आहे असं मत ओबीसी बांधवांनी व्यक्त केल आहे. आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातील वातावरण चांगलं तापलं असून मराठा विरुद्ध ओबीसी असावा आता वाद पेटला आहे.

मराठा आरक्षण संदर्भातील हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केले होते. यानंतर त्यांच्या आठपैकी सहा मागण्या सरकारनं मान्य केल्या होत्या. यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्बात सरकारनं काढलेल्या जीआरला विरोध दर्शवला आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलने देखील सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. तसेच आम्ही देखील मुंबईत येऊ असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र, त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळं ठिकठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी समाज बांधव ऐकमेकांसमोर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री, मग..; संभाजीनगरमध्ये फोटोसह झळकले बॅनर, जोरदार चर्चा