Nanded Crime News : नांदेडच्या (Nanded) अर्धापुरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तलाठ्यानेच प्रभारी तहसीलदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. रेती तस्कराचे वाहन पकडल्याने तलाठ्याची दादागिरी समोर आली आहे. या प्रकरणी तहसीलदाराच्या तक्रारीवरुन तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळं तलाठ्याचा मुजरोपणा समोर आला आहे. यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

तलाठी अन रेती तस्करांचे मधुर संबंध एका घटनेने चर्चेत

दरम्यान, नांदेडच्या अर्धापुरमध्ये घडलेल्या घटनेमुळं तलाठी अन रेती तस्करांचे मधुर संबंध एका घटनेने चर्चेत आले आहेत. अर्धापुरचे प्रभारी तहसीलदार राजेश शिंदे यांनी रेती तस्करावर धाड टाकली. या कारवाईत त्यांनी अवैधरित्या रेती तस्करी करणारे चार वाहने पकडली. मात्र रेती तस्करांचा मित्र असलेला तलाठी प्रदीप पाटील तिथे आला अन त्याने कारवाईला विरोध करत तहसीलदारांना मारहाण केली. या प्रकरणी तहसीलदाराच्या तक्रारीवरून तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाळू तस्करी रोखण्यासाठी सरकारकडून कठोर उपाययोजना, तरीदेखील अवैध वाळू तस्करी सुरु

राज्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  आता वाळू तस्करी करणारे वाहन पहिल्यांदा पकडले गेल्यास परवाना 30 दिवस निलंबित ठेवून वाहन अडकवून ठेवले जाईल. दुसऱ्या गुन्ह्यात 60 दिवस परवाना निलंबित करून वाहन अडकवून ठेवण्यात येईल. तर तिसरा गुन्हा झाल्यास संबंधित वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. महसूल विभागाने 26 नोव्हेंबरला याबाबतचे शासन परिपत्रक जारी केले होते. 

Continues below advertisement

वाळू चोरीमुळे सरकारी महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी

राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे सरकारी महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी होते. याशिवाय अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत असून कारवाईसाठी जाणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कडक धोरण अवलंबण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील राज्यातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Jalgaon News: जळगावात अवैध रेती वाहतूक उघडपणे सुरू; रेती माफियांची मुजोरी, महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या 7 घटना