Nanded Crime News : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आई वडील आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन मुलांनीच मिळून आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार इथं घडली आहे. या हत्यानंतर दोन्ही मुलांनी आत्महत्या (Suicide) केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलीस तपासात वेगळंच वळण
मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार इथल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणाला पोलीस तपासात वेगळंच वळण मिळालं आहे. उमेश लाखे आणि बजरंग लाखे या भावंडांनी आपल्या जन्मदात्या आई वडील राधाबाई रमेश लाखे यांची हत्या केली आहे. या दोघांचीही गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर आरोपींनी मुगटला रेल्वेसमोर जात स्वतःला संपवले आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासानंतर मृत दोघा भावावर आई-वडिलांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक विवंचनेतून ही घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने या घटनेनंतर समाजमन सुन्न झालं आहे.
एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा
एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेह पाहताच गावकरी घराकडे धावल्याचं पाहायला मिळालं आहे. बजरंग लखे (22) आणि उमेश लखे (26) अशी या आत्महत्या केलेल्या मुलांची नावे आहेत. या दोघांचे मुगट रेल्वे स्थानक क्षेत्रात ट्रॅकवर कटलेल्या अवस्थेत आढळले आहेत. त्यांची ओळख पटल्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. दरम्यान, या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी आधी वडील रमेश होनाजी लखे (52) आणि आई राधाबाई रमेश लखे (48)या दोघांची हत्या केली होती. त्यानंतर दोघांनी धावत्या रेल्वेच्या पुढे उड्या घेत जीवन संपवलं आहे. दरम्यान, सुरुवातीला एकाच घरातील चौघांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासानंतर पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. यामध्ये मुलांनीच जन्मदात्या आई वडिलांना संपवल्याचे समोर आले आहे. आर्थिक विवंचनेतून या सर्वांनी जीवन संपवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: