अहमदाबादमध्ये क्रॅश झालेलं विमान कोणाच्या काळात घेतलं होतं? नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांना सवाल, म्हणाले पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून मीडियासमोर
अहमदाबाद विमान दुर्घटेनवरुन काँग्रस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांवर (Praful Patel ) टीका केली.

Nana Patole on Praful Patel : अहमदाबाद विमान दुर्घटेनवरुन काँग्रस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांवर (Praful Patel ) टीका केली. अहमदाबादमध्ये क्रॅश झालेलं विमान हे कोणाच्या काळात घेतलं होतं, त्याची माहिती त्यांनी द्यावी. विमानाचा पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून 30-30 मिनिटं ते मीडियासमोर बोलत होते. काय गरज होती? असा सवाल पटोलेंनी प्रफुल्ल पटेलांना केला. टाटाचे सिओ अहमदाबाद दुर्घटनेबद्दल फक्त 3 मिनिटे बोलल्याचे पटोले म्हणाले. मी प्रफुल पटेल यांचा मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो. पण ते जर आमच्याशी सन्मानाने वागले नाही तर कोणाचे कपडे कसे उतरायचे हे आम्हाला माहित आहे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली.
प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यात कलगीतुरा
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना चिल्लर नेते म्हटले होते. यावरुन नाना पटोलेंनी प्रफुल पटेल यांचा खरपूस समाचार घेतला. मी चिल्लर नाही तर ठोक आहे. मागच्या दरवाज्यानं मी निवडून जात नाही, असा टोला देखील पटोलेंनी पटेलांना लगावला.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. काही दिवसापूर्वीच नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती बँक राष्ट्रवादीने 13 वर्षात पोखरून काढला आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याच्या समाचार घेताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल नाना पटोले यांच्यावर टीका करीत नाना पटोले सारखे नेते हे आता रिकामे झाले आहेत आणि रिकामे झालेले लोक सध्या नेतृत्व करीत आहेत. पूर्वी राज्याच नेतृत्व करायला निघाले होते. मग विदर्भाच्या नेतृत्व करायला निघाले. आज जिल्ह्याचे नेते राहिले नाहीत असे चिल्लर नेते राजकारण करत असल्याचे वक्तव्य पटेलांनी केलं होते. यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. मी तुमच्याशी मोठा भाऊ म्हणून सन्मानाने वागतो त्यामुळे तुम्ही देखील माझ्याशी सन्मानाला वागायला पाहिजे नाहीतर कोणाचे कपडे कसे उतरवायचे हे मला चांगले माहित आहे असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार पलटवार केला.
संजय राऊतांपेक्षा जास्त मला बोलता येतं
शेतकरी दिवस-रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला दोन टाईम जेवायला तरी मिळते नाहीतर का पैसे खाऊन जगली नसते तुम्ही लोक असी टीका केली पटोलेंनी केली. जे ईमानदार असतात त्यांना चिल्लर म्हटलं जात नाही. ज्या काँग्रेसने मोठ केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपसोबत गेले आणि भाजपासोबत साठ-गाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीकाही पटोलेंनी पटेलांवर केली. मी मोठा भाऊ म्हणून तुमचा सन्मान करतो पण सन्मानाने राहिले नाही तर कोणाचे कपडे कसे उतरायचे हे मला जास्त माहिती आहे. माझ्या विरोधात जे वक्तव्य करत आहेत ते त्यांनी सांभाळलं पाहिजे नाहीतर संजय राऊतांपेक्षा जास्त मला बोलता येते एवढं त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असे पटोले म्हणाले.
यांना बँक विकायची आहे, शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यवस्था संपवायच्या आहेत
मागच्या 18 वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेत काय उजेड पडला ते सांगा आणि सांगायचा दम नसेल तर लोकांना मत मागण्याचा अधिकार नाही असेही पटोले म्हणाले. 10 लाख रुपये एका वोटरची किंमत लावून मत विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे. यांना बँक विकायची आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यवस्था संपवायच्या आहेत असेही पटोले म्हणाले.
मी जनतेतून निवडून येतो मागच्या दरवाज्यातून जात नाही
मी जनतेतून निवडून येतो मागच्या दरवाज्यातून जात नाही, असा टोला देखील पटोले यांनी प्रफुल्ल पटेलांना लगावला. नागपूरचं पार्सल (नाव न घेता परिणय फुके) आणि प्रफुल पटेल हे मागच्या दरवाज्याचे लोकं आहेत. स्वतः निवडणूक लढल्यासारखं माझ्या मतदारसंघात विधानसभेत त्यांनी प्रचार केला. गल्ली गल्लीत फिरले तरी मला हरवू शकले नाहीत असे पटोले म्हणाले. मी चिल्लर नाही तर मी ठोक आहे. मी मागच्या दरवाजाने निवडून जात नाही असे पटोले म्हणाले. ते सांभाळून बोलतील तर मी पण सांभाळून बोलेल नाहीतर संजय राऊत यांचा व्हिडिओ दाखवू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त माहिती मला आहे असे पटोले म्हणाले.



















