Nana Patole on Praful Patel : निवडणुकीत लोकं पैसे घेतात आणि मतं जिथं मारायची तिथेचं मारतात, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी भंडाऱ्यात केलं होतं. त्यांच्य या टीकेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  प्रफुल पटेलांनी आजपर्यंत पैशाच्याचं भरोशावर राजकारण केलं आणि  निवडणुका जिंकल्या आहेत. यापुढेही ते असंच करणार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

Continues below advertisement

प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य हास्यास्पद 

प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य खऱ्या अर्थानं हास्यास्पद आहे. प्रफुल्ल भाईंनी आमचे स्नेही नरेंद्र भोंडेकर यांच्यावरचं वक्तव्य केलं असावं असं मला वाटतंय असे नाना पटोले म्हणाले. त्यामुळं प्रफुल्ल भाईंनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलेलं आहे. त्या स्टेटमेंटला त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

निवडणुकीत लोकं पैसे घेतात आणि मतं जिथं मारायची तिथेचं मारतात, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात केलं आहे. कोणीही स्वत:ला बाहुबली सजत असेल तर आम्ही अनेक बाहुबलींना निवडून दिलं असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. त्यामुळं पटेलांचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल उपस्थित केला जातोय. फक्त पैशांच्या आधारावर कोणी जिंकू शकत नाही. समजनेवालो को इशारा काफी है असेही पटेल म्हणाले. दरम्यान, आता प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया 

दरम्यान, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा रोख कोणाकडे आहे हे तुम्ही सोधून काढा पण पटेलांचा रोख आमच्याकडे नाही हे मात्र नक्की असे फडणवीस म्हणाले. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया  दिली आहे. त्यांचे राजकारण काय आहे हे मला माहित नाही. मी एकवेळा नाही चार वेळी निवडून आले आहे. निवडणूक ही मी व्यवहार समजत नाहीतर सेवा समजते. मी पूर्णपणे या प्रक्रियेच्या विरोधात असल्याचे सुळे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?