एक्स्प्लोर

भाजपचं सरकार हे बेशरम, नालायक, कृषीमंत्र्यांच्या कोकाटेंच्या वर्तनावरुन पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले, सरकार घालवण्यासाठी जनतेनं रसत्यावर उतरावं

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे ( Manikrao Kokate) हे सभागृहात मोबाईलवर जंगली रमी ॲपवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केलाय. यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिलीय.

Nana Patole on BJP : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे ( Manikrao Kokate) हे सभागृहात मोबाईलवर जंगली रमी ॲपवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला. कृषीमंत्र्यांच्या अशा वर्तनावर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole ) यांनी भाजपप्रणित राज्य सरकारवर चांगलेचं ताशेरे ओढले  आहेत. जेव्हा जेव्हा सभागृहात शेतकऱ्यांचा मुदद्दा उपस्थित करण्यात आला, तेव्हा तेव्हा कृषीमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. ज्या वेळेस उपस्थित झाले तर ते रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं त्या व्हिडिओवरून दिसत असल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळं भाजपचं सरकार हे बेशरम, नालायक असून ते बधिर झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी केलाय. या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आता जनता आणि शेतकऱ्यांनीच मोट बांधली पाहिजे, असा रोष नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

भाजपचं सरकार हे बेशरम आणि नालायक सरकार आहे. बधिर झालेलं हे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचा बाप म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा बाप मोदी होऊ शकत नाही, शेतकरी तुमचा बाप होऊ शकतो असे नाना पटोले म्हणाले. कृषीमंत्र्यांच्या राजीनामा मागणार नाही, त्यात वेळ घालवण्यापेक्षा आता जनता आणि शेतकऱ्यांनीच मोट बांधली पाहिजे. या सरकारला पायउतार करण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे असे पटोले म्हणाले. 

रोहित पवारांनी शेअर केला होता व्हिडिओ

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याची वेळ आली तर आम्ही भाजप श्रेष्ठींना विचारु, असे वक्तव्य नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी केले होते. यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ 'एक्स'वर शेअर केला आहे. यात माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादीला कुठलीही गोष्ट भाजपला विचारल्याशिवाय करता येत नाही. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरीदेखील यांना निर्णय घेता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते. त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.  

रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. 

महत्वाच्या बातम्या:

Manikrao Kokate : 'रमी' खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं अजब उत्तर; म्हणाले, युट्युबची जाहिरात स्किप करताना...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget