Nana Patole :  पंतप्रधान ज्यावेळी देशाला संबोधीत करतात तेव्हा देश हितासाठी किंवा संकट आल्यावर बोलतात असं मला आजवर माहीत होतं. मात्र 2014 पासून तर आजच्या देखील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 150 पेक्षा अधिक वेळा काँग्रेसचे नाव घेतलं. 56 इंचेची छाती असणाऱ्या मोदींना काँग्रेस एवढी भीती का? असा सवाल करत काँग्रेस नेते नाना पटोल .यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच टेलिप्रामटर समोर येऊन केलेलं भाषण हे देशांच्या महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी आणि मनूवादी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतं असल्याचे ते म्हणाले.

Continues below advertisement

देशाचे पंतप्रधान बहुजनांच्या विरोधात आहे हे स्पष्ट झालं 

पंतप्रधान मोदी बोलत असताना मी मोबाईलवर पाहत होतो अनेक लोक त्यांना फेकू तर ताही लोक मी बोलू शकत नाही अशा भाषेत बोलत होते. देशाचे पंतप्रधान वारंवार खोट बोलत असल्याने त्यांच्यावर देशातील जनतेचा विश्वास राहिला नाही असे पटोले म्हणाले. 2023 साली महिला आरक्षण बिल आणल्यावर सर्व विरोधी पक्षांनी त्याला सपोर्ट केला आणि मंजूर झाला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं 2024 मध्ये आम्ही जनगणना करु त्यानंतर रचना करण्यात येईल असं सांगितलं. आता 2026 आलं आहे. राहुल गांधींच्या दबावामुळे यांना जनगणना मान्य करावी लागली. आता जनगणना सुरू झाली. त्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही. यावरुन देशाचे पंतप्रधान बहुजनांच्या विरोधात आहे हे स्पष्ट झालं आहे..

टेलिप्रामटर समोर येऊन केलेलं भाषण हे देशांच्या महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी 

नारीशक्तीला नमन करून नाव मोठं ठेवायचं आणि मणिपूरमध्ये महिलांचा वस्त्रहरण केलं त्यावर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. लोकसभेत भाजपने 10 टक्के महिलांना तिकीट दिलं तर काँग्रेसने 13 टक्के महिलांना तिकीट दिलं आहे. भाजपाला महिला नको आहेत. आम्ही महिलांचा सन्मान केला आहे. हे नारीशक्तीला नमन नव्हतं तर खुर्चीसाठी नमन होतं. यांचा मूळ पक्ष भाजप नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. टेलिप्रामटर समोर येऊन केलेलं भाषण हे देशांच्या महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी आणि मनूवादी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होता.

Continues below advertisement

बेइमानी करून तुम्ही सत्तेत

बहुजन ,दलित सह सर्व समावेशक यामध्ये काय तरतूद केली जाणार याबद्दल स्पष्ट सांगा आम्ही देखील याला समर्थन देऊ. बहुजनांना न्याय मिळावा ही भूमिका राहुल गांधींनी नेहमी मांडली आहे. या लोकांना देश कधी माफ करणार नाही आणि बहुजनांची महिला यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असेही पटोले म्हणाले. बेइमानी करून तुम्ही सत्तेत आलात की तुमची भूमिका आता देशातील बहुजन स्वीकारणार नाही. तुम्ही डोळ्यातून अश्रू आणू शकला असता पण सुदैवाने आज रडला नाहीत. तुम्ही कितीही नौटंकी केली तरी तुमचा नकलीपणा देशाच्या जनतेसमोर आला आहे असे पटोले म्हणाले. 

भाजपकडून केले जाणाऱ्या कॅम्पेनला आमच्याकडूनही प्रत्युत्तर दिल जाणार

भाजपकडून केले जाणाऱ्या कॅम्पेनला आमच्याकडूनही प्रत्युत्तर दिल जाणार असल्याचे पटोले म्हणाले. राजीव गांधींनी 73 वी घटना दुरुस्ती करून तळागाळातील महिलांना संधी निर्माण करून देण्याचे काम केलं आहे. 70 वर्षात काँग्रेसने देशाला मागे टाकलं म्हणणाऱ्या मोदींनी देशाला किती मागे टाकलं हे सांगावं? असा सवाल पटोलेंनी केला. ट्रम्प आज पाकिस्तान माझा मित्र आहे असं सांगतो. इंदिरा गांधींनी अमेरिकेला धमकी देऊन पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र तुमची हिंम्मत झाली नाही असे पटोले म्हणाले. तुम्हाला ट्रम्पचं नाव घ्यायची भीती वाटते. तुम्ही देशाची मान झुकवली आहे आणि इराण सारख्या मित्राला गमावण्याचं पाप केल्याचे पटोले म्हणाले. तुम्ही नोटबंदी करून लोकांना रांगेत लावून त्या निर्णयाचा समर्थन करतात असेही ते म्हणाले. .