Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला आहे. याचा राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण  1 हजार 892.61 कोटी रुपये निधी  शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

मंत्रालय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार  तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्रीमंडळातील सदस्य,मुख्यसचिव राजेशकुमार यावेळी उपस्थित होते.

सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा उद्देश आहे. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.

Continues below advertisement

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना?

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्षी बारा हजार अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मना योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत. आतापर्यंत सहा हप्त्यामध्ये 93 लाख 9 हजार शेतक-यांना 11हजार 130 कोटी रूपये थेट लाभ हस्तांतरणाव्दारे जमा करण्यात आला आहे.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना उत्पादन खर्च भागवता यावा आणि शेतीतून  टिकाऊ व्हावी यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत असून या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आर्थिक मदत देण्यात येते. आतापर्यंतच्या सहा हप्त्यांमधून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत रक्कम जमा झाली आहे. सातवा हप्ता वितरित झाल्यानंतर या लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या