भगवानगड हा ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या ठरावाप्रमाणे, इथून पुढे चंद्र-सूर्य असेपर्यंत गडावर राजकीय व्यक्ती कोणीही बोलणार नाही, असं नामदेवशास्त्रींनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
भगवानगड, दसरा मेळावा आणि पंकजा मुंडे यांच्याबाबतची स्पष्ट भूमिका नामदेवाशास्त्री यांनी मांडली.
पंकजा मुंडे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने नामदेव शास्त्री यांच्यांशी संपर्क साधून, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
पंकजाने हर्ट केलं
पंकजा मुंडे मुलीसारखी आहे. ती स्वत: भगवानगडाची मुलगी असल्याचं सांगते. मात्र ऑडिओ क्लिप ऐकल्यापासून मला दु:ख झालं. पंकजांची क्लिप ऐकल्यानंतर हर्ट झालो, आता त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही, असं नामदेव शास्त्री म्हणाले.
..तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा
भगवानगडावर ट्रस्टने इथे भाषण करण्यास परवानगी दिलेली नाही. आम्ही याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे ट्रस्टच्या विरोधात जाऊन जो कोणी सभा घेईल, त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नामदेव शास्त्रींनी केली.
राजकारणाला मीडियाने महत्त्व देऊ नये
भगवानगडाचं व्यक्तीमत्त्व हे राजकीय नाही तर संतांचं आहे. राजकारणाला मीडियाने महत्त्व देऊ नये. ही गादी संतांची आहे. अपवाद म्हणून गोपीनाथ मुंडे इथे बोलत होते. म्हणून धार्मिक ठिकाणी तो वारसा चालवावा, असा आग्रह मीडियाने धरु नये. गोपीनाथराव हे भगवानबाबांपेक्षा लहान आहेत. ते त्यांचे शिष्य आहेत, असं नामदेव शास्त्री म्हणाले.
या गडावर राजकारण नको, अशी भगवानगड ट्रस्टची भूमिका आहे.
कन्या मानलं म्हणून भगवानगडाचा वाटा मागू नका
गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांना भगवानगडाची कन्या मानलं. त्यांना भावनिक आधार दिला. मात्र आमच्या भावनेचा आदर न करता, कन्या मानलं म्हणून तुम्ही लगेच भगवानगडाचा वाटा मागता का, असा सवाल नामदेव शास्त्रींनी केला.
मीडियामुळे पंकजा हर्ट
राजकारण्यांची परंपरा गडाच्या डोक्यावर नको. या गोष्टीचा मीडियाने इश्शू केला. मीडियामुळे मी पंकजाविरोधात काहीतरी राजकारण करतोय असा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतोयस असं नामदेवशास्त्री म्हणाले.
ना धनंजय, ना पंकजा
माझ्याप्रकरणामध्ये ना धनंजय मुंडे आहे, ना पंकजा मुंडे आहे. भगवानगडाचं अस्तित्व मानत असाल, भगवानबाबांना मानत असाल, तर दिलेला आदेश पाळा, असं आवाहनही नामदेवशास्त्रींनी केलं.
गोपीनाथ गड उभा राहिल्याचा आनंद
गोपीनाथ गड उभा राहिल्याचा आनंद झाला हे मी त्या-त्या वेळी जाहीर बोलत आलेलो आहे. गोपीनाथ गड उभा केल्याचा आनंद, पंकजाने वडिलांचं अस्तित्व जिवंत ठेवलं, असं नामदेवशास्त्री म्हणाले.
गोपीनाथ मुंडेंची तुलना नको
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर भगवान गडावर कोणत्याही भाषणाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपीनाथ मुंडे हे वेगळं व्यक्तीमत्त्व होतं. ते भगवानबाबचे शिष्य होते. त्यांची कोणाशीही तुलना नको, असंही नामदेवशास्त्रींनी नमूद केलं.
गडावर कोण यायचं हे भक्त ठरवतील
भगवानगडावर दसऱ्याला कोण यायचं, कोण नाही, हे भक्त ठरवतील, असं म्हणत नामदेवशास्त्रींनी पंकजा मुंडेंच्या भाषणाला विरोध केला. गवानगडाच्या पावित्र्यासाठी इथं कोणतंही भाषण नको असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी
पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे
पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी
ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री
पंकजा मुंडे राजीनामा द्या : धनंजय मुंडे
भगवान गडावर येणारच, पंकजा मुंडेंचा व्हिडीओ मेसेज
भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट
दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे
महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा
भगवानगडावर राडा, नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे समर्थक भिडले
भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र