नालासोपारा :  नालासोपारा पूर्व (Nalasopara) येथील शिवशक्ती हॉटेल परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मारामारी पोलिसांच्या (Police) उपस्थितीतच झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही किरकोळ वादातून दोन गटांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. 

Continues below advertisement

दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर हात उगारला, परिसरात गोंधळाचं वातावरण

दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर हात उगारत परिसरात गोंधळ निर्माण केला. घटनास्थळी पोलिस उपस्थित असतानाही काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा; पोलिसांशी धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

 
अंबरनाथमध्ये भर रस्त्यात दारूच्या नशेत दोन तरुणांनी घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणांनी पोलिसांसोबत देखील गैरवर्तन केलं आहे. अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी रात्री दोन तरुण दारू पिऊन रस्त्यावरच गोंधळ घालत होते. त्यांनी नागरिकांसोबत वाद घालत गैरवर्तन केले, ज्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मद्यधुंद अवस्थेतील या तरुणांनी पोलिसांशीही हुज्जत घालत धक्काबुक्की केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अखेर दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
 

बियर पाजण्यास नकार दिल्याने तरुणाला रिक्षा चालकांकडून अमानुष मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल

 
बियर पाजण्यास नकार दिल्याच्या  कारणावरुन स्मितेश  पाटील नावाचा  तरुणाला दोन रिक्षा चालकांनी लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केल्याची घटना अंबरनाथ शहरात घडली आहे. ही सर्व घटना  सीसीटीव्ही कैद झाली आहे . याप्रकरणी रिक्षा चालक महेश सूर्यवंशी आणि मंगेश तपासे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस करीत आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीआहे. 

 

Continues below advertisement