Nagpur News : पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय मंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांशी (Political Connections) ओळख असल्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या अजित पारसे (Ajeet Parse) याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन 42 दिवस झाले आहेत. वैद्यकीय कारणे देत त्याने चौकशीचा ससेमिरा टाळला होता. मात्र, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तो चौकशीसाठी वैद्यकीयदृष्ट्या 'फिट' असल्याचा अहवाल दिला असून तसे पोलिसांना देखील (Nagpur Police) कळविले आहे. त्यामुळे लवकरच त्याची चौकशी होणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.


11 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेने डॉ. राजेश मुरकुटे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पारसे याने डॉ. मुरकुटे यांची साडेचार कोटींनी फसवणूक केली होती. यानंतर 9 नोव्हेंबर रोजी वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार यांनी 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. पारसे याने अनेक महिलांना ब्लॅकमेल करून फसवणूक केल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी पारसेचा मोबाइल तपासला. यामध्ये पारसे याने सहा महिलांसोबत पोलिसांच्या केलेले चॅटिंग हाती ब्लॅकमेल लागले. त्या महिलांना करून त्यांचे शोषण केल्याचा संशय आहे. बदनामीच्या भीतीमुळे या महिला करण्यास तक्रार पुढे येत नाहीत.


फसवणुकीचे बळी ठरलेले लोक 'हनीट्रॅप' मध्ये फसल्याने ते तक्रार नोंदवत नाहीत. प्रकृतीचे कारण दिल्याने पारसेला अटक झालेली नाही. तो खूप आजारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत तो एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीमुळे त्याची चौकशीदेखील पोलिसांना करता आली नव्हती; परंतु पोलिस आता त्याची भेट घेऊन चौकशी करू शकतात, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस आयुक्तांनादेखील कळविले आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस आयुक्तांना देखील कळवले आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता आहे.


अटक टाळण्यासाठी वैद्यकीय 'जुगाड'


अजित पारसे याने स्वतःची अटक टाळण्यासाठी वैद्यकीय कारण पुढे केले आहे. तसेच त्याच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धडपड करत असल्याची माहिती आहे. तो सध्या चौकशीसाठी फिट असला तरी पोलिसांना त्याला अटक करता येणार नाही. वैद्यकीय कारणांमुळे आम्हाला त्याची चौकशी करता येत नव्हती. आता तो दवाखान्यातच आहे. त्याची प्रकृती लक्षात घेता त्याला अटक करता येणार नाही असे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.


ही बातमी देखील वाचा


Sanjay Raut: ईडीनं संजय राऊतांविरोधात दाखल केलेली याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार