Nagpur SBL Company Blast News : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठास्फोटझाल्याचीघटनाघडलीय. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट (SBL Blast Update) झालाय. दरम्यान या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. (Nagpur SBL Company Blast News) आतापर्यंत या भीषण स्फोटत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर सर्व मृत कामगारांचे पार्थिव वैद्यकीय आणि उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ॲम्बुलन्सद्वारे आणण्यात आले आहे.
दुसरीकडे, घटनास्थळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने पोहोचले आहेत. सोबतच एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके हे देखील पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांनी दिली आहे.
नेमकंकायम्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? (CM Devendra Fadnavis)
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Nagpur SBL Company Blast News : एसबीएल एनर्जीकडून पत्रकजारी
काटोल येथील आमच्या पॅकिंग युनिटमध्ये झालेल्या दुःखद घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या घटनेमुळे बाधित झालेल्या सहकाऱ्यांसोबत/कामगारांसोबत आणि कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आहेत. त्यांचे कल्याण ही आता आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही आपत्कालीन प्रतिसादांचे आयोजन करत आहोत आणि बाधितांना सर्व शक्य मदत आणि वैद्यकीय मदत देत आहोत. आमचे पथक बचाव कार्य सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहे. आम्ही चालू तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत.
आमच्या सर्व ऑपरेशन्समध्ये कडक सुरक्षा मानके राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. घटनेची आमची अंतर्गत चौकशी सुरू आहे. उपलब्ध होताच अपडेट्स दिले जातील. असं एसबीएल एनर्जीकडून जारीकरण्यातआलेल्यापत्रकातम्हटलेआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
