एक्स्प्लोर

Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप

Mudhoji Raje Bhosale :  एनसीईआरटीच्या आठवीतील इतिहासाच्या पुस्तकात असललेला वर्ष 1759चा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीने एकतर्फी हटवल्याचा आरोप मुधोजीराजे भोसले यांनी केले आहे.

Mudhoji Raje Bhosale नागपूर एनसीईआरटीच्या आठवीती इतिहासाच्या पुस्तकात असललेला वर्ष 1759चा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीने (NCERT) एकतर्फी हटवला, दरम्यान ही कृती राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली केल्याचा आरोप नागपूरकर भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी केले आहे. पुस्तकातून हटवलेला तो नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्यात यावा, अशी मागणी ही त्यांनी केली आहे. ते नागपुरात शिवजयंती (Shivaji Maharaj Jayanti 2026) निमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

NCERT : 1759 च्या 'त्या' नकाशाचा नेमका वाद काय?

1759 मधील मराठा साम्राज्याचा "कटक ते अटक" असा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीच्या आठव्या वर्गाच्या पुस्तकात छापण्यात आला होता. मात्र, तो नकाशा चुकीचा असून मराठ्यांचा राजस्थान मधील काही भागात अधिपत्य न होता असा आरोप करत राजस्थान मधील काही राजघराण्यांनी आणि राजपूत संघटनांनी तो नकाशा हटवण्याची मागणी केली होती. संबंधित नकाशा पुस्तकातून हटवण्यात यावा, या मागणीसाठी राजस्थानमधील काही राजघराण्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे मागणी लावून धरली होती. संपूर्ण वाद पाहता एनसीईआरटीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आठव्या वर्गाच्या पुस्तकातून संबंधित नकाशा हटवण्याचे ठरवत विद्यमान पुस्तकामध्ये तो नकाशा प्रकाशित केलेला नाही.

Mudhoji Raje Bhosale : मोगलांनी मराठ्यांसोबत "अहमदिया तह" केला होते, त्या तहाकडेही एनसीईआरटीने दुर्लक्ष केल

दरम्यान, महाराष्ट्रातील काही तरुणांनी त्या संदर्भात आरटीआय अंतर्गत अर्ज केले, त्यामध्येही एनसीईआरटीने तो नकाशा हटवल्याचे मान्य केले. धक्कादायक बाब म्हणजे हा नकाशा पुस्तकातून हटवण्यासाठी जी समिती कार्यरत होती त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही जाणकार इतिहासकार नव्हता. गजानन भास्कर मेहेंदळे या ज्येष्ठ मराठी इतिहासकाराच्या निधनानंतर एनसीईआरटीच्या कमिटीवर कुठल्याही मराठी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली नाही. मुघलांनी अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणांपासून त्यांच्या साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी राजस्थानचे काही भाग मराठ्यांच्या संरक्षणाखाली दिले होते. त्या संदर्भात मोगलांनी मराठ्यांसोबत "अहमदिया तह" केले होते. त्या तहाकडेही एनसीईआरटीने दुर्लक्ष केल्याचा मुधोजी राजांचा आरोप आहे.

Mudhoji Raje Bhosale : काशा पुस्तकातून हवणे ऐतिहासिक तथ्याशी छेडछाड

'कटक ते अटक'पर्यंत मराठा साम्राज्य विस्तारलेला असताना, जर राजस्थानचा भाग मराठ्यांचे अधिपथ्यखाली नव्हता, तर मराठे महाराष्ट्रातून अटक पर्यंत पोहोचले कसे??? असा सवाल ही मुधोजीराजांनी या संपूर्ण वादा संदर्भात विचारला आहे. मराठा साम्राज्याचा खरा विस्तार दाखवणारा आणि मराठा साम्राज्य "कटक ते अटक" विस्तारलेला होता असा ऐतिहासिक तथ्य दर्शवणारा तो नकाशा पुस्तकातून हवणे ऐतिहासिक तथ्याशी छेडछाड करण्यासारखे आहे. महाराष्ट् सरकार आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने हा मुद्दा उचलून धरत मराठा साम्राज्याचा वैभव नकाशाच्या स्वरूपात इतिहासातील पुस्तकात पुनर्प्रकाशित होईल, यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
Embed widget