Nagpur : नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, मोर्चेस्थळी यशवंत स्टेडियममध्ये आंदोलनकर्ती सीताबाई धांडे यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. यशवंत स्टेडियम परिसरात अचानक घडलेल्या घटनेमुळं पोलीस दलाची मोठी तारांबळ उडाली. आग लावून आत्मदहनाचा प्रयत्न करताना आंदोलनकर्ते धावल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यातील खराडी-चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरकडून झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन
पुण्यातील खराडी-चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डर आणि प्रशासनाकडून झालेल्या अन्यायाविरोधात हे आंदोलन केले होते. बोगस संमतीपत्रावर बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्या ठिकाणी लावलेल्या आगीत 100 झोपड्या जळाल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. 23 एप्रिल 2025 रोजी पुण्यात लागलेल्या आगीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, मात्र बिल्डरवर अद्याप गुन्हा दाखल न केल्याचा ही आंदोलकांचा आरोप आहे. राजकीय दबावामुळे अटक होत नाही, त्यामुळं महिलांनी नागपुरात येऊन आंदोलन केले आहे.
पोलिसांनी तातडीने आग विझवली
यावेळी सीताबाई धांडे यांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी तातडीने आग विझवली. पोलीसांनी वेळीच आग विझवली नाहीतर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. महिला आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. रुमाल जाळला असताना पोलीसानी धाव घेतली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. पोलीस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.
सध्या नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज विविध मुद्यावरुन सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली. कापूस आणि सोयाबीनला योग्य दर न मिळाल्यामुळं विरोधतांनी आक्रमक पवित्रा घेतला. हा मुद्दा विधानभवनाबाहेर आणि पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर गाजला. गळ्यात कापसाच्या बोंडांच्या माळा घालून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारविरोधात निषेध नोंदवला आणि शेतकऱ्यांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कर्जमाफी, कापूस व सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. “सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी” अशा घोषणा देत त्यांनी महायुती सरकारवर केवळ घोषणा केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचाही मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.
महत्नाच्या बातम्या: