Nagpur : कर्जमाफी, हमीभावासह विविध मागण्यांसाठी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केले आहे. ते सध्या हजारो शेतकरी घेऊन नागपुराच पोहोचले आहेत. दरम्यान,. त्यांच्या आंदोलनाला विविध संघटनांचा, पक्षांतचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अशातच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देऊन परत जात असतांना खासदार अमर काळे यांनी पोलीस आणि सीपी यांना चांगलेच फटकारले. अमर काळे यांना पोलिसांनी धक्का दिल्याची घटना घडली. यामुळं खासदारांनी पोलीस कमिशनर यांना फटकारले. ते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळालं.  

Continues below advertisement

 सीपी यांना जाण्यासाठी पोलिसांकडून धक्का बुकी केली

सरकारचे शिष्टमंडळात असलेले मंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून गेल्यावर पोलीस कमिशनर यांच्यासाठी रस्ता मोकळा करत असतांना पोलिसांनी नागरिकांसह खासदार यांना धक्का दिला आहे.  पोलिसांकडून सीपी यांना जाण्यासाठी धक्का बुकी केली जात होती. सीपी काय देव आहे काय? त्यांना जायचं होत तर बाजूने जायचं होतं. पोलिसांना हेच सांगितलंय की सीपी हे स्वार्गातून तर आले नाहीत. त्यांनी व्यवहार बरोबर करायला हवं हेच सांगितलंय अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिली आहे.

आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला गेलो तरी आंदोलन थांबवणार नाही

सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. आपली मुख्य मागणी कर्जमुक्तीची आहे, त्यासाठी सरकारची तयारी आहे. मात्र, ते तारीख सांगणार नाहीत, अशी त्यांची भूमिका आहे. आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला गेलो तरी आंदोलन थांबवणार नाही, शांततेत आंदोलन सुरू ठेऊ, असे कडू यांनी म्हटले. मी चर्चेला जाणार, कोणा कोणाचा माझ्यावर विश्वास आहे सांगा? आपण आंदोलन संपवून जाणार नाही. चर्चेसाठी काही लगेच जाणार नाही, चर्चेत कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर आपण परत येऊन रेल्वे रोखू, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आपण आंदोलन थांबवायचे की सुरू ठेवायचे हे ठरवू. मात्र, उद्या राज्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रहाराचे कार्यकर्ते जातील आणि कर्जमाफीबद्दल मागणीचे निवेदन तहसीलदारांना देतील, असेही कडू यांनी जाहीर केले.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा