Nagpur News : नागपुरातील ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या (Nirmal Ujjwal Society) नागपुरातील कार्यालयात खात्यातील पैसे आणि ठेवींच्या परतीसाठी ठेवीदारांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालंय. मुदत संपूनही ठेवींची रक्कम मिळत नसल्याने संतप्त ठेवीदार नंदनवन परिसरातील पतसंस्थेच्या (Nirmal Ujjwal Credit Cooperative Society) मुख्य कार्यालयात पोहोचले होते. नंदनवन येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयाबाहेर ठेवीदारांची काल (5 ऑक्टोबर) मोठी गर्दी उसळल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, परस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी ही बंदोबस्त लावला होता. शिवाय संस्थापक सचिव प्रमोद मानमोडे यांच्या दालना बाहेरही पोलिस तैनात करण्यात आले होते. पतसंस्थेच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त पाहून पतसंस्थेवर आयकर विभागाची धाड पडल्याची अफवा पसरली. त्यामुळेही गर्दी वाढली होती.

Continues below advertisement

Nagpur News : मुदतपूर्तीनंतरही ठेवींची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये मोठा असंतोष

दरम्यान, मुदतपूर्तीनंतरही ठेवींची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये गेले काही दिवस पतसंस्थेच्या कारभारासंदर्भात मोठा असंतोष निर्माणझाला आहे. चेक बाऊन्स होण्याच्या घटनांमुळेही ठेवीदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर ‘सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीज’कडून संस्था अवसायनात काढण्याची नोटीस बजावल्याची माहिती पसरल्याने खातेदार आणि ठेवीदारांची चिंता वाढली आहे. संस्थेच्या विदर्भातील 50 हून अधिक शाखांमध्ये सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या ठेवी अडकल्या आहेत. ठेवीदारांच्या पैशांच्या परतीसाठी संस्थापकांनी 45 ते 60 दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र हा कालावधी उलटूनही अनेक ठेवीदारांना रक्कम मिळाली नसल्याने ही रोष वाढला आहे. त्यामुळेठेवीदारांना त्यांची रक्कम नेमकीकधीमिळेलआणित्यासंदर्भात निर्मल उज्ज्वल पत संस्थानेमकंकायपाऊलउचलते, हेपाहणंमहत्वाचंठरणारआहे.

Continues below advertisement
Yavatmal News: रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदार आर्थिक संकटात

यवतमाळच्या जनसंघर्ष सहकारी बँक, अष्टविनायक पतसंस्था, महिला नागरी पतसंस्था, महिला बाबाजी दाते बँकेत ठेवीदारांचे रक्कमेची अनियमितता प्रकरण ताजे असतानाच आता रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांचे रक्कम मिळत नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत मागील काही दिवसांपासून विड्रॉल मिळणे बंद झाल्याने ठेवीदारांनी मुख्य शाखेत एकच गर्दी केली. या बँकेच्या घाटंजी, वणी शाखा असून 35 कोटींच्या ठेवी आहे. आर्थिक व्यवहार सुरळीत नसल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहे.

दरम्यान, एफडी, दैनिक बचत ठेव व इतर माध्यमातून ठेवीदारांनी तब्बल 35 कोटी रुपये या सोसायटीत गुंतविल्याचे समोर येत आहे. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी 31 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले होते. संस्था ठेवीदारांना त्यांच्या ठेवी व व्याज परत करीत नसल्याचा आरोप केला होता. तसेच निवेदनाची प्रत मुख्य कार्यालयात लावली. त्यानंतर मुख्य शाखेत यवतमाळ व घाटंजी येथील ठेवीदारांनी गर्दी करीत विड्रॉल देण्याची मागणी केली. परंतु, अध्यक्ष, उपाध्यक्ष व जबाबदार अधिकारीच नसल्याने ठेवीदार बराचवेळ ताटकळत राहिले.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी आमचे पैसे घेऊन पलायन केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी ठेवीदारांनी सुरू केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या