Nagpur : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील उमरेड तालुक्याती सुरगाव शिवार इथं धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचा व पथकाचे मदतीने पाण्यातून मृतदेह करण्यात आले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश आहे.

पोलिसांचा तपास सुरु

ही दुर्घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यानं ही दुर्घटना आहे की आत्महत्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसर हादरुन गेला आहे. तसेच यामुळं हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. 

मृतांची नावे

एहतेशाम अन्सारी, 26 वर्षरोशनी चौधरी, 32 वर्षअंजली चौधरी, 25 वर्षमोहित चौधरी, 10 वर्षलक्ष्मी चौधरी, 8 वर्ष

महत्वाच्या बातम्या:

भान विसरून ती समुद्राकडे पाहत राहिली, पण एका लाटेने होत्याचं नव्हतं झालं; हरिहरेश्वर समुद्राने जिल्हाधिकारी कार्यालयातील महिलेला केलं गिळंकृत