Maharashtra news: पर्यटनाच्या नावाखाली अभयारण्यात जाऊन एफ 2 वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांना पर्यटकांनी बराच वेळ घेरल्यानंतर आता या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे.  राज्यातील व्याघ्र प्रकल्पासंदर्भात आता मोठा निर्णय घेण्यात आला असून आता पर्यटकांना राज्यातील व्याघ्र प्रकल्पात जाताना मोबाईल नेता येणार नाही. एफ 2 वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांचा मार्ग दोन्ही बाजूने रोखल्याची  घटना घडल्यानंतर आता जंगल सफारीला जाताना पर्यटकांसह चालक आणि गार्ड्सलासुद्धा मोबाईल बंदी करण्यात आली आहे. व्याघ्र प्रकल्पात मोबाईल व्यतिरिक्त स्थिर कॅमेरा आणि चल कॅमेरा नेता येणार आहे. 


उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात 31 डिसेंबरला पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याची घटना उघडकीस आली होती. पर्यटनाच्या नावावर अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उच्च न्यायालयाने याबाबत सोमवारी स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देत राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दोन दिवसात जबाब नोंदविण्याचे आदेश दिले.


नक्की झाले काय होते?


उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात 31 डिसेंबरला पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याची घटना उघडकीस आली होती.  राज्यभरातील व्याघ्र प्रकल्पात पर्यटक, वाहन चालक आणि गाईड्स कडून वन्यप्राण्यांचे फोटो किंवा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी होणारा धुळघुस थांबविता यावा यासाठी, आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी जात असणाऱ्यांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. 31 डिसेंबरला कुही वनक्षेत्रातील गोठणगाव सफारी मार्गावर ‘एफ 2’ वाघिण आणि तिच्या पाच बछड्यांचा मार्ग पर्यटकांच्या वाहनांनी दोन्ही बाजूंनी रोखून धरला होता. या घटनेमुळे वाघिण व तिच्या बछड्यांना बराच वेळ अडथळ्यांचा सामना करावा लागला.


हायकोर्टाची गंभीर दखल


या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सोमवारी ही कारवाई केली. राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दोन दिवसांत जबाब नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले असून उद्या या प्रकरणाची तातडीने सुनावणी होणार आहे.


सफारी चालक आणि गाईडचे निलंबन


याप्रकरणी चार सफारी चालक आणि गाईडला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, चालकांना 25,000 रुपये आणि गाईडला प्रत्येकी 1,000 रुपयांचा दंड वनविभागाने ठोठावला आहे. अभयारण्यात जाऊन वाघाची डरकाळी ऐकण्याची इच्छा अनेकांची. वाघाला समोरासमोर पाहून मोबाईलमध्ये कैद करण्याची न आवरणाऱ्या धडपडीमुळे राज्यभरातील व्याघ्र प्रकल्पात पर्यटक वाहन चालक आणि गार्ड कडून वन्य प्राण्यांचे मार्ग अडवले जातात. उमरेड पवनी करांडला अभयारण्यात पर्यटकांच्या वाहनांनी एफ दोन वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मार्ग रोखून धरला होता. या घटनेनंतर वाहन चालक गार्ड्स आणि वाहनांवर निलंबनासह दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 


हेही वाचा:


धक्कादायक! वाघाचे 4 तुकडे करुन तलावाजवळ फेकले; वन विभाग घटनास्थळी, समोर आलं धक्कादायक कारण