Nagpur News: चोरट्यांना महावितरण देणार 'महाझटका'; वीज चोरी पकडली तर थेट समाजात होणार नाचक्की; नागपुरात महावितरणचे कठोर पाऊल
Nagpur Mahavitaran : वीज चोरीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता महावितरण विभागाकडून मोठं पाऊल उचलल्या गेलं असून आता चोरी केली की ग्राहकाचे नाव आणि पत्ता जाहीर करण्यात येणार आहे

Nagpur Mahavitaran on Electricity Theft Acctions: वीज चोरी करणाऱ्यानां Electricity Theft आता महावितरण महाझटका देण्याच्या तयारीत आहे. वीज चोरीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता महावितरण विभागाकडून मोठं पाऊल उचलल्या गेलं असून आता चोरी केली की ग्राहकाचे नाव आणि पत्ता जाहीर करण्यात येणार आहे. वीज चोरीच्या प्रकरणाला (Electricity Theft Case) आळा बसावा आणि कुणीही वीज चोरी करू नये, यासाठी आता महावितरणने (Mahavitaran) हे कठोर पाऊल उचलले आहे.
दरम्यान, वीज चोरी करताना पकडल्यास चोरट्यांचे (Electricity Theft) नाव आणि पत्ता आता सार्वजनिक करण्याचा निर्णय महावितरणाकडून घेण्यात आला आहे. वीज चोरीला आळा घालण्यासाठी प्रत्येक वीज जोडणीवर लक्ष ठेवण्याचा महावितरणचा दावा आहे. परिणामी वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणची आता कठोर कारवाई सुरु केली आहे. महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी उच्चस्तरीय बैठकीत या संदर्भात घोषणा केली आहे. तर वीज चोरी हा सामाजिक अपराध असून जनजागृती आवश्यक असल्याचे महावितरणचे (Nagpur Mahavitaran) म्हणणे आहे.
Nagpur Mahavitaran: प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा केला जाणार सन्मान
अशातच, महाराष्ट्रातील वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वीजचोरी संदर्भात कठोर कारवाईच्या सूचना जारी केल्या आहे. तर दुसरीकडे प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा सन्मान देखील केला जाणार आहे. वीज चोरीमुळे होणाऱ्या महसुली नुकसानीचा भार प्रामाणिक ग्राहकांवर पडत असल्याचा महावितरणचा दावा आहे. वीज चोरीमुळे शॉर्टसर्किट, ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि आग लागण्यासारख्या दुर्घटनांचाही धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आता वीज चोरी करणाऱ्यांची माहिती समाजासमोर आणली जाणार आहे.
Nagpur Electricity Theft Case: पाच महिन्यांत 1,054 ठिकाणी कारवाई; तब्बल 1 कोटी 36 लाख रुपयांची वीज चोरी
नागपूर जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत 1,054 ठिकाणी वीज चोरी पकडली आहे. या वीज चोरीची किंमत तब्बल 1 कोटी 36 लाख रुपये इतकी आहे. स्मार्ट मीटर असतानाही वीज चोरीची प्रकरणे समोर आले आहेत. वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून वीज चोरीवर अंकुश ठेवण्याचा आता महावितरणचा प्रयत्न आहे. अशातच, महाराष्ट्रातील वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वीजचोरी संदर्भात कठोर कारवाईच्या सूचना जारी केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या






















