Nagpur Accident News : नागपूर जिल्ह्यात काटोल- वरुड (Katol to Warud) या सिमेंट महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहे. त्यामुळे हा महामार्ग दुचाकीचालकांसाठी अपघाताचा महामार्ग बनला आहे. असं म्हणण्या मागचं आणखी एक कारण म्हणजे मागच्या 10 दिवसात दोन दुचाकीस्वरांचा यात नाहक जीव (Accident News) गेला आहे. त्याला कारणीभूत या सिमेंट रस्त्याला पडलेल्या भेगा ठरल्या आहेत. ज्यामध्ये 19 मार्चला महेश धोटे या तरुणाची दुचाकी चांदस (वाठोडा) येथे सिमेंट रस्त्याच्या भेगेत अडकून स्लिप झाली. या अपघातात (Nagpur Accident News) महेश धोटेंच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Katol to Warud Road Accident)
Katol to Warud Road Accident: एक वर्षात 30 अपघातांची नोंद, 11 प्रवाशांनी गमावले प्राण
तर दुसरी घटना 27 मार्चला घडली. ज्यामध्ये प्रतीक पांडुरंग निकोसे रा. जलालखेडा असे मृतकाचे नाव असून रस्त्यावरील भेगा खड्ड्यांमुळे वाहनाचा ताबा सुटला आणि त्यात त्याचा अपघात झाला. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा देखील मृत्यू झालाय. मागच्या एक वर्षात या रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे 30 अपघातांची नोंद झालीय. ज्यात 11 प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Nagpur Accident News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याचे सिमेंटीकरण दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. तरीही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा व खड्डे पडल्याचे चित्र आहे. यापूर्वीही अनेक अपघातांची नोंद झाली आहे. असं असताना प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. परिणामी महिन्याभरात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. पोलिसांनी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेनं नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. तर नागरिकांकडून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे या बाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारले असता ते म्हणाले कि, या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
