Nagpur Biggest Solar Parts Project: नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रातील मोठी गुंतवणूक होत आहे. वारी एनर्जी लिमिटेड (Waaree Energies Limited) कंपनीने नागपूरच्या बुटीबोरी नवीन औद्योगिक परिसरात भारतातील सर्वात मोठे 10 गिगावॅट क्षमतेचे एकात्मिक सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. सौर इनगॉट आणि वेफर हे सोलर पॅनल तयार करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे पार्ट्स आहेत. हे पार्टस आजवर चीनमधून आयात करावे लागत होते. मात्र पहिल्यांदाच त्याचे भारतात उत्पादन सुरू होत आहे. शनिवारी (14 मार्च) या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे नागपुरात हजारो रोजगार निर्माण होणार असून नागपूरच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार, असादावाकरण्यातयेतआहे.
Nagpur News : नागपुरात हजारो रोजगार, औद्योगिक विकासाला मोठी चालना
- नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट
- बुटीबोरी येथे Waaree Energies Limited चा 10 GW प्रकल्प..
-पहिला टप्पा – 300 एकर जागेवर प्रकल्प...
- पहिल्या टप्प्यात 6200 कोटी रुपयांची गुंतवणूक
-एकूण गुंतवणूक – सुमारे 30 हजार कोटी रुपये
-2 हजार थेट तर 4 हजार अप्रत्यक्ष रोजगार
Nagpur Biggest Solar Parts Project: सोलर पॅनल उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर्तेकडे वाटचाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीच्या 'सोलर इनगॉट आणि सोलर वेफर' उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी नागपूरात पारपडले आहे. नागपूरच्या नवीन बुटीबोरी एमआयडीसीमध्ये तब्बल 300 एकर क्षेत्रात 6,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून या प्रकल्पाचा पहिला टप्पा भरला जाणार आहे. हे प्रकल्प तीन एकूण टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. सोलर इनगॉट आणि वेफर हे सोलर पॅनलसाठी लागणारा यांत्रिक स्वरूपाचा कच्चामाल असून सध्या भारत सोलर पॅनल तयार करण्यासाठी सोलर इनगॉट आणि वेफर परदेशातून आयात करतो. मात्र हे प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर भारताचे सोलर इनगॉट आणि सोलर वेफर साठीचे इतर देशांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि भारत सोलर पॅनल उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर्तेकडे वाटचाल करेल. असादावाकरण्यातआलाआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
- Devendra Fadnavis on Gas Shortage: देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठणकावून सांगितलं, म्हणाले, 'LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय'
