Nagarpalika  Pandharpur Election :  आज राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी बऱ्याच ठिकाणी चांगले मतदान होत आहे. तर काही ठिकाणी संथ गंतीनं मतदान प्रक्रिया सुरु आहे. काही ठिकामी मतदान केंद्रावर गोंदळ उडाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. दरम्यान, लोकशाहीच्या उत्सवासाठी आज राज्यभरात लाखो मतदार नगरपालिका मतदानात सहभागी होत असताना पंढरपूरमध्ये एक नवरदेव चक्क मुंडोळ्या बांधून घोड्यावर बसून वाजत गाजत थेट मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Continues below advertisement

आज नगरपालिकेच्या निवडणुकांचे मतदान सुरु असताना मोठी लग्न तिथी आहे

आज नगरपालिकेच्या निवडणुकांचे मतदान सुरु असताना मोठी लग्न तिथी देखील आहे. अशावेळी आपलं लग्न आहे म्हणून मतदानाचा हक्क चुकू नये यासाठी पंढरपुरातील सुजित दिवाण हा नवरदेव विवाह असताना वरात घेऊन आधी थेट मतदान केंद्रावर आला आणि मतदान केले. पूर्वी आधी लगीन कोंढाण्याचे अशी म्हण होती मात्र पंढरपूरमध्ये सुजित दिवाण या नवरदेवाने आधी लगीन लोकशाहीचे आणि मग स्वतःचे हे सिद्ध करुन दाखविले आहे, या नवरदेवाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. 

राज्यातील 262 नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/ कर्मचारी सज्ज  आहेत. अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदार चांगला प्रतिसाद देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी संथ गतीनं मतदान होत असल्याचं पाहायला मिळात आहे.

Continues below advertisement

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लांबणीवर 

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत (Nagarparishad Election Result) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत (Nagarparishad Election Result) न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे गेल्यामुळे प्रशासनाचा ताण तर वाढलाच आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nagarparishad Election Result postpone: नगरपरिषद, नगरपंचायती निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे नेमकं काय होणार? सरकार अन् उमेदवारांचा खर्च कैकपटीने वाढणार