जळगाव : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायता निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरला असून शेवटच्या दोन दिवसांवर ही निवडणूक आली आहे. तब्बल 9 वर्षानंतर बहुतांश नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच, यंदा निवडणुकीत मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं योगदान देणं बंधनकार आहे. त्याच, पार्श्वभूमीवर येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी रजा देण्याचे बजावले आहे. तसेच, कामगारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन केलंय. 

Continues below advertisement

जळगाव जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुर्णी, वरणगाव, यावल इत्यादी नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२५(बी) अन्वये मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. मागील निवडणुकांत काही आस्थापनांनी सुट्टी न दिल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेत, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने, हॉटेल्स, मॉल्स, आयटी कंपन्या, व्यापारी प्रतिष्ठाने आदींना हे आदेश लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सुट्टी न दिल्यास कारवाई

अत्यावश्यक व अविरत सेवांमध्ये सुट्टी देणे शक्य नसल्यास कर्मचारी व कामगारांना 2 ते 3 तासांची विशेष सवलत देऊन मतदानाचा हक्क बजावता येईल, याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास आणि त्यामुळे मतदार वंचित राहिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Continues below advertisement

काय सांगतो कायदा?

i) कोणत्याही व्यावसायिक, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत काम करणाऱ्या आणि लोकसभेच्या किंवा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल.

(ii) उप-कलम (१) नुसार सुट्टी दिल्यामुळे अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात किंवा कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसाचे वेतन सामान्यतः मिळणार नाही या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्याला त्या दिवशी सुट्टी दिली नसती तर त्याला मिळालेले वेतन दिले जाईल.

(iii) जर एखाद्या नियोक्त्याने उप-कलम (१) किंवा उप-कलम (२) च्या तरतुदींचे उल्लंघन केले तर अशा नियोक्त्याला पाचशे रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

(iv) हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही ज्याच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या नोकरीत आहे त्या नोकरीत धोका किंवा मोठे नुकसान होऊ शकते

हेही वाचा

नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?