अहमदनगर: सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं शक्य नसल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे दरवर्षी कर्जाचे पाच हप्ते करून देत दरवर्षी एक हप्ता आणि व्याज भरण्याची सोय करून द्यावी. अशी मागणी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोळपेवाडीत आयोजित करण्यात आलेल्या शंकरराव काळे पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.


या पुरस्कार सोहळ्यात माजी मंत्री विलास काका उंडाळकर आणि ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

‘शेतकऱ्याला फक्त 25 आणि 1 लाख कर्जमाफी देऊन काहीही होणार नाही. समजा, एखाद्या शेतकऱ्याचं पाच लाख कर्ज आहे तर एका वर्षाला त्याच्याकडून 1 लाख आणि व्याज घ्यायचं. म्हणजे त्याचा संसारही चालेल आणि परतफेडही होईल. चांगलं वर्ष आलं तर तो दोन लाख भरेल.’ असा उपाय त्यांनी सुचवला.

या कार्यक्रमामध्ये बोलताना कवी ना. धो. महानोर यांनी शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली.  त्यांनी कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा या ठिकाणी माडंल्या. राज्यात 83 सालीच ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ हा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, आज सर्वत्र फक्त जाहिरातबाजी सुरु आहे. अशी टीका महानोर यांनी केली.

सरकार कोणाचंही असो चांगल्या गोष्टीसाठी जो करेल तो महाराष्ट्राचा. अस सांगत राज्यात शेतकऱ्यांना पाणी व्यवस्था करुन दिल्यास आणि वेळेवर हक्काच अनुदान दिलं तर शभर टक्के परिस्थिती सुधारेल असा विश्वासही महानोर यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

तीन दिवसात कर्जमाफीबाबत निर्णय घ्या, अन्यथा... : अजित पवार

...तर शेतकरीच फडणवीस सरकारला इंगा दाखवेल : शरद पवार

देशाचा पोशिंदा ऐतिहासिक आंदोलनाच्या तयारीत!

राज्यातलं सरकार केवळ गाजरं दाखवणारं : अजित पवार

पीकविम्यातून 50 टक्के कर्जवसुलीचा निर्णय अखेर मागे