Kalyan Crime News : कल्याणमध्ये (Kalyan) एक धक्कादायक घटना घडली आहे.  शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या झाली आहे. ​कल्याण तालुक्यातील मुरबाड महामार्गावरील मामणोली गावाजवळ जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्रांनी हल्ला करुन ही निघृण हत्या करण्यात आली आहे. किरण घोरड असे हल्ल्यात मृत झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचे नाव असून तो टिटवाळ्यातील गोवेली गावचा रहिवासी होता.

Continues below advertisement


टोळक्याने राडा घालत किरण घोरड यांच्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला


दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, टोळक्याने राडा घालत किरण घोरड यांच्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर किरण घोरड यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्याच आले, मात्र, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दखल करत तपास सुरु केला आहे. 


नांदेड शहरात प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी केली तरुणाची हत्या


नांदेड शहरात प्रेमप्रकरणातून एका मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाचा खून केला होता. सक्षम ताटे  या तरुणाला मुलीचे वडील आणि भावाने पाठलाग करुन ठार (Nanded Murder) मारले होते. सक्षमवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला निर्घृणपणे संपवण्यात आले होते. सक्षम ताटे  याचे त्याच्या मित्राची बहीण आंचल मामीलवाड हिच्याशी प्रेमसंबंध (Love) होते. याची कुणकुण लागल्यानंतर आंचलच्या वडिलांनी सक्षमला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतरही या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु राहिल्याने गुरुवारी संध्याकाळी नांदेड (Nanded news) शहरातील जुना गंज भागात आंचलचे वडील आणि भावाने सक्षमची हत्या केली होती. संध्याकाळी 5 वाजून 20 वाजण्याच्या सुमारास सक्षम ताटे याला मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले होते. याठिकाणी आल्यानंतर गजानन मामीलवाड, साहिल मामीलवाड आणि अन्य तिघांनी मारहाण करुन त्याची हत्या केली.  या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सक्षम ताटे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी त्याची प्रेयसी आंचल मामीलवाड हिने एक अनपेक्षित कृती केली. ती सक्षमच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिने सक्षमच्या मृतदेहासमोर लग्नाचे काही विधी केले. तसेच तिने सगळ्यांदेखत कपाळावर सक्षमच्या नावाचे कुंकू लावले


महत्वाच्या बातम्या:


Nanded Crime: जातीय विखारातून वडिलांनी प्रियकराला संपवलं, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न केलं, अंगाला हळद अन् कपाळावर कुंकू भरलं