Murlidhar Mohol Pune : पुण्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. 2020 साली महापौर होतो, अजितदादा (Ajit Pawar) पालकमंत्री होते. त्यावेळी हि कल्पना समोर आली होती की दुहेरी पुलाचा विचार (Double Decker Bridge in Pune)करायला हवा. त्यातवरून मेट्रो, पूल आणि खाली रस्ता तयार करावा, असा निर्णय झाला होता. अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केलाहोता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीहीयाविकासकामासाठी साथ दिली. अजित पवार यांनी जो विचार केला होता, त्याची दूरदृष्टी होती की याची निर्मिती करताना एकत्रित हा पूल व्हावा, त्यानुसार हा प्रकल्प आज पूर्ण होत आहे. थोड्या दिवसांनी मेट्रो देखील धावेल. अजित पवार यांना आम्ही आज खूप मिस केलंय. अशीभावनाभाजपनेतेआणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनीबोलतानाव्यक्तकेलीय. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले. यावेळीतेबोलतहोते.
पुण्याच्या विकासामध्ये सातत्याने आम्ही एकत्रित काम केले. शहरातला पहिले उद्घाटन आहे ज्याला अजित दादा नाहीयेत. अनेक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या पुलाला अजित पवारांचे नाव देण्यात यावं, अशी सगळ्यांची भावना होती. अशीप्रतिक्रिया केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलतानाव्यक्तकेलीआहे.
Sunetra Pawar : अजितदादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री या पुलाचे लोकार्पण करत आहेत. सर्व पुणेकरांचे अभिनंदन करते, जागतिक महिला दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा देते. या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. अजित दादांची प्रकर्षाने आठवण होते. अजित दादांनी पुल पडण्याच्या धाडसी निर्णय घेतला. त्याचा पाठपुरावा दादांनी केला, प्रसगी वाईटपणा घेतला. पुणेकरांना कमीत कमी त्रास व्हावा, याची अजित दादा काळजी घेत होते. अजितदादाच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प पूर्ण झालाय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित दादांकडे विकासकामासाठी पाठपुरावा केला. अर्थसंकल्पमध्ये पायभूत सुविधासाठी 21% वाढ करण्यात आलीय. अजितदादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया अशीभावनाउपमुख्यमंत्रीसुनेत्रापवारयांनीबोलतानाव्यक्तकेलीआहे.
पुण्यातील डबल डेकर पूल आजपासून खुला (Double Decker Bridge in Pune)
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
