Mumbai : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघा काहीच वेल शिल्लक राहिला आहे. थोड्याच वेळात नवीन वर्ष 2026 चे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या जुहू चौपाटीवर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर सेलिब्रेशन करण्यासाठी मोठी पसंती दिली आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून जुहू चौपाटीवर नागरिकांना पाण्यापासून लांब राहण्याच्या सूचना

मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून जुहू चौपाटीवर थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी ही मोठी गर्दी केली आहे. दुसरीकडे समुद्रात भरती असल्यामुळे पाणी रस्त्याजवळ पोहोचले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी जुहू चौपाटीवर पाण्यापासून लांब जाण्यास नागरिकांना सांगत आहेत. या गर्दीमध्ये काही घटना घडू नये यासाठी जुहू चौपाटीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबत गर्दीमध्ये लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज त्यासोबत पालिकेच्या लाईफ गार्ड च्या मदतीने पाहणी करत आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील भाविकांची गर्दी

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील भाविकांची गर्दी दिसून येत आहे. अवघ्या देशाचा श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या शिर्डीत देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. साईबाबांच्या समाधी मंदिरावर आकर्षक फुलांसह आकर्षक अशी विद्युत रोशनी करण्यात आली असून भाविकांची गर्दी दिसून येत आहे. पुढच्या काही तासात नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी भाविक देखील शिर्डीत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. 

नवी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत इंडिया गेटवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गर्दी

नवी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत इंडिया गेटवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. पोलिसांनी खबरदरीचा उपाय म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा तपास सुरू केला आहे. इंडिया गेटवर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले आहेत. 2025 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. 

नाशिक मध्ये आज 31 डिसेंबरच्या अनुषंगाने शहरातील सर्व प्रमुख भागांमध्ये नाकाबंदी केली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देखील विशेष खबरदारी नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरील मुंबई नाका परिसरात पोलिसांकडून वाहनांची वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन होऊ नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पोलिसांकडून शहरातल्या विविध भागात नाकाबंदी करत सतर्कता बाळगली जात आहे.