Maharashtra Rain Updates: पुढील पाच दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Weather Updates) वर्तविला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rain Updates) कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदुर पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Updates)

Continues below advertisement

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होतंय. त्यामुळे पाऊस परतण्याची शक्यता आहे.  या कालावधीत महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेलच त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट असेल. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Mumbai Rain Updates)  

पालघरमध्येही मुसळधार पाऊस- (Palghar Rain Updates)

पालघर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी मान्सूनचा आगमन झालं होतं परंतु समाधानकारक पाऊस होत नव्हता. मात्र कालपासून पावसाने जिल्ह्यात जोर पकडला असून जिल्ह्यात पहाटेपासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून शेतांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर शहरांमधील सकल भागांमध्ये सुद्धा ठीक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर अगदी जून महिना संपत असताना जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्याने पाणीटंचाई जाणवत होती त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात पेरण्या खोळंबल्या होत्या मात्र हा चांगला पाऊस सुरू झाल्याने पाणीटंचाईचा संकट मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून भात पेरण्याही सुरू होत आहेत त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Continues below advertisement

हिंगोलीत जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी- (Hingoli Rain Updates)

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. औंढा नागनाथ शहरामध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे औंढा नागनाथ शहरातील रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळाला असून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना या पाण्यामधून वाट काढत जावं लागलं आहे. शहरातून जाणाऱ्या हिंगोली परभणी या मार्गावरून  मोठ्या पाणी वाहत आहे. आज बरसत असलेला पाऊस हा या मोसमाती सर्वात मोठा पाऊस मानला जातोय. तर जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी सुद्धा साचले आहे.

रत्नागिरीत सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग- (Maharashtra Mumbai Rain Updates)

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनमुळे चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाचे हास्य फुलले आहे. कृत्रिम पाणी देत जीवापाड जपलेल्या भात रोपवाटिका आता लावणीसाठी सज्ज झाल्या असून शेतात चिखलात उतरून भात लावताना शेतकरी आणि महिलांची लगबग पाहायला मिळत आहे. हिरवीगार रोपे, पावसाच्या सरी आणि मेहनतीने ओथंबलेली कोकणची भातशेती पुन्हा जिवंत झाली आहे. जरी काही भागांत लावणीसाठी अजून 15 ते 20 दिवस प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी मान्सूनच्या पुनरागमनाने कोकणच्या बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी उशिराने पाऊस आल्याने अनेक भागात अजूनही भात शेतीचे रोपे तयार झालेली नाहीत मात्र दापोली मधील काही भागात कृत्रिम रित्या पाण्यावर तयार केलेली भाताची रोपे लावणीसाठी तयार झाल्याने शेतकरी लावणीच्या कामात गुंतले असल्याचे पाहायला मिळत आहे.