एक्स्प्लोर

कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत, उलट त्यांच्याकडूनच टोल वसुली, मनसे आक्रमक, MSRDC आणि IRB च्या अधिकाऱ्यांना विचारला जाब 

मुंबई पुणे महामार्गावर कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत, उलट त्यांच्याकडूनच टोल वसुली केली आहे. या मुद्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे.

Mumbai Pune Expressway :  मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर तीन आणि चार फेब्रुवारी रोजी टँकर उलटून झालेल्या भीषण वाहतूक कोंडीबाबत MSRDC तसेच IRB Infrastructure या टोल वसुली करणाऱ्या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने जाब विचारला आहे. येत्या चार दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, तर मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाके बंद पाडल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी किंवा प्रसाधनगृह अशा कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत

ज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर घाटामध्ये उलटल्याने मुंबईपुणे दोन्ही दिशांना प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी किंवा प्रसाधनगृह अशा कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. उलट, अत्यंत निर्लज्जपणे या प्रवाशांकडून टोल वसुली करण्यात आली असा आक्षेप मनसेने घेतला आहे. आपत्तीच्या काळात जर प्रशासन प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा देऊ शकत नसेल, तर मग ही टोल वसुली नेमकी कशासाठी केली जाते? असा सवाल उपस्थित केला. या थेट प्रश्नावर MSRDC आणि IRB चे अधिकारी निरुत्तर झाल्याचे मनसे कडून सांगण्यात येत आहे. 

32 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला

32 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या हजारो प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया गेला. त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला, आर्थिक नुकसान झाले, लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या सर्व नुकसानीची भरपाई शासन किंवा प्रशासन करणार आहे का? असा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख, माऊली थोरवे, हेमंत पाटील, उपाध्यक्ष रवी शेलार, सुनील अंधारे पाटील, रमाकांत साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway Traffic) टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती. तब्बल 32 तास लोक या वाहतुक कोंडीत अडकलेली होती. यानंतर मोठा हाहाकार माजला होता. त्यानंतर हा टँकर हटवल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत झाली. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारकडून मिसिंग-लेन तयार करण्यात येत आहे. मात्र याही मिसिंग लिंक प्रकल्पाची (Mumbai-Pune Expressway Missing Link) अनेक डेडलाईन पार होताना पाहायला मिळतेय.

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर...राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात अडकले!
शेवाळे, निरुपम, अडसूळ, किर्तीकर...राज्यसभेची जागा 1, इच्छुक 8; एकनाथ शिंदे नेत्यांच्या गराड्यात अडकले!
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
धक्कादायक! पालघरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रकला भीषण आग, चालकाचा जळून मृत्यू तर वाहक गंभीर जखमी 
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Sharad Pawar : एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
एका जागेवरुन मविआत चढाओढ, मात्र शेवटी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं? आदित्य ठाकरेंच्या नाराजीचं काय? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget