Mumbai Police Recruitment News : मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पूर्वेत मरोळ पोलीस कॅम्पमध्ये (Marol Police Camp ) सुरु असलेल्या पोलीस भरतीमध्ये मुलांनी आज मोठा गोंधळ घातला आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांनी रस्त्यावर उतरुन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस भरतीसाठी (Police Bharati) आज शेवटचे दिवस आहेत, अशा स्थितीत मुलांना सकाळपासून मैदानी चाचणीसाठी आतमध्ये न घेतल्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून पोलीस भरतीसाठी मुलं मरोळ पोलीस कॅम्प बाहेर रस्त्यावर उभी होती. अखेर आज शेवटी आंदोलन केल्यानंतर मुलांना यश मिळालं आहे. मुलांना आता ग्राउंड मैदानी चाचणीसाठी आतमध्ये घेतलं आहे.
पोलिसांच्या नियोजनअभावी गोंधळ झाला, स्थानिकांची माहिती
मरोळ पोलीस कॅम्पचा मुख्य रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे मुख्य रस्ता बंद आहे. त्यामुळं मुलं रस्त्यावर उतरल्यामुळे आजूबाजूचे सोसायट्यांचे गेट सुद्धा बंद झालं आहे. मरोळ पोलीस कॅम्पचा आजूबाजूचा राहणाऱ्या लोकांना या गोंधळामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या नियोजनअभावी हा गोंधळ झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
पोलीस भरतीसाठी आलेला सर्व मुलांना मैदानी चाचणीसाठी घेतलं आत
पोलीस भरतीसाठी आलेला सर्व मुलांना पोलिसांनी रस्त्यावरुन मैदानी चाचणीसाठी आतमध्ये घेतलं आहे. सकाळपासून आतमध्ये न घेतल्यामुळे मुलांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता रस्त्यावर थांबून त्यांनी गोंधळ घातला होता. यानंतर मोठ्या संख्येमध्ये मरोळ पोलीस कॅम्प बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. आंदोलनकर्त्या सर्व मुलांना रस्त्यावरुन मैदानावर घेण्यात आलं आहे. त्यामुळं मरोळ मरोशी रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत सुरु झाला आहे.
मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी आलेला मुलांनी मरोळ पोलीस कॅम्प बाहेर मोठा गोंधळ घातला होता. मरोळ पोलीस कॅम्प समोर काही मुलांनी रस्त्यावर थांबून आंदोलन केलं होतं. मुंबई पोलीस दलात शिपाई पदासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज मैदानी चाचणी होणार आहे. मात्र यामध्ये काही मुलांना ईमेल द्वारे बोलावण्यात आलं होतं, तर काही मुलांना ई-मेलच्या माध्यमातून संपर्क केला नसल्याचे समोर आले आहे. यामुळं भरतीसाठी आलेल्या मुलांनी रस्त्यावर थांबून आंदोलन केलं आहे. आंदोलन पाहता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा करून पुन्हा सुरू केला आहे. सध्या मरोळ पोलीस कॅम्प बाहेर मोठा गोंधळ सुरु आहे.