गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची गच्छंती निश्चित?
मेहतांचे प्रतिज्ञापत्र आपण पाहावे आणि त्यानंतर युक्तीवाद करावा, त्यानंतर मेहतांबद्दल नेमकं काय करायचं तो पाहुयात, असं कोर्टाने रायानी यांना सांगितलं. मेहता यांचं प्रतिज्ञापत्र द्यावं असं कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं आहे. मुंबईतील ताडदेवच्या एसआरए घोटाळ्यामुळे, प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक आहेत. गेल्या चार दिवसांपासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत प्रकाश मेहतांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला आहे. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. मुख्यमंत्र्यांनी अद्याप मला स्पष्टीकरण मागितलेलं नाही, असं स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिलं आहे. संबंधित बातम्या विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्रीमुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश