एक्स्प्लोर

धक्कादायक! ड्रग्जच्या ओव्हरडोसने कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, मुंबईच्या गोरेगाव नेस्को संकुलातील घटना

मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील लाइव कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Mumbai : मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील लाइव कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात ही धक्कादायक घटना घडली आहे. नेस्को कडून आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये सहभागी झालेल्या एका नामांकित कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती 

नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला तब्बल 3 ते 4 हजारांची गर्दी उपस्थित होती. ड्रग्ज ओव्हरडोस घेतल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती मिळत आहे. आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेस्कोकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही घटना परवा संध्याकाळी घडल्याची माहिती समोर येत आहे. वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कॉलेज वर्तुळात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात 11 एप्रिल रोजी एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तीन ते चार हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान जास्त प्रमाणात मद्यपान आणि ड्रग्ज घेतल्यामुळे काही तरुणांना त्रास झाला. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे यातील 2 तरुणींना मुंबईच्या जोगेश्वरी येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटीं 26 लाखांचे कोकेन जप्त

नागपूरमध्येही धक्कादायक घटना ध़ली आहे. राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटीं 26 लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी याबाबातची माहिती दिली आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक देखील करण्यात आली आहे. औषधाच्या 50 कॅप्सूलमध्ये लपवून ड्रग्ज ची तस्करी केली जात होती. या प्रकरणी डीआरआयने धडक कारवाई केली आहे. अमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगार आता किती कुटील मार्ग अवलंबत आहेत, याचा धक्कादायक नमुना नागपुरात समोर आला आहे.

शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये कोकेनचे कॅप्सूल लपवून तस्करी

शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये  कोकेनचे कॅप्सूल लपवून तस्करी केली जात होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिट हजरत निजामुद्दीन ते बंगळुरु जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये कारवाई करत कोकेनच्या तस्करीच्या भांडाफोड केला आहे. यात डीआरआय पथकाने तब्बल 4 कोटी 26 लाख किमतीचे 853 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल 8700 रुपयांनी स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील ताजे दर
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल 8700 रुपयांनी स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील ताजे दर
Sangram Bhandare : विकास लवांडेंवर शाईफेक; आता संग्राम भंडारे म्हणाले, 'आम्हाला आनंद नाही पण, धर्माच्या कामात आडवा येणाऱ्या हिंदूच्या डोक्यावर....'
विकास लवांडेंवर शाईफेक; आता संग्राम भंडारे म्हणाले, 'आम्हाला आनंद नाही पण, धर्माच्या कामात आडवा येणाऱ्या हिंदूच्या डोक्यावर....'
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
Pune Hospital Bomb Case : हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरली, हडपसर, मांजरी परिसरात पोलिसांकडून कसून चौकशी; आरोपी अद्याप फरार
हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरली, हडपसर, मांजरी परिसरात पोलिसांकडून कसून चौकशी; आरोपी अद्याप फरार
Ambernath Nagar Parishad: अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
Maharashtra Reservation Policy: स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
Embed widget