मुंबई : मनसे नेते संतोष धुरी यांनी वरळीतळ्या एका पबमधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच रात्री उशिरापर्यंत पब आणि हॉटेल चालत आहेत. नियमांचं उल्लंघन केलं केलं जातंय. त्यामुळे वरळी महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? असा सवाल धुरी यांनी उपस्थित केला होता. यानंतर पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी  वरळीतल्या पबवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती एबीपी माझाला दिली आहे.


वरळी इथल्या कमला मिल कंपाउंड मध्ये YOUNION पबमध्ये गर्दीचा एक व्हिडीओ मनसे च्या संतोष धुरी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातच अशा प्रकारे रात्री उशीरापर्यंत पब, हॅाटेल चालतात जिथं गर्दी होते आणि कोविड नियंमांच पालन केलं जात नाही, असा आरोप देखील संतोष धुरींनी केला आहे.


याच व्हीडिओवरुन भाजपनं पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलंय. वरळीत कोरोना काळात नाईट लाईफसाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू होत नाही का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थित केला होता.