Mumbai: सोन्याचा भाव 96 हजारांच्या घरात असताना बँकॉकमधून आणलेलं तब्बल पावणे 7 किलो वजनाचं सोनं मुंबई विमानताळावरून अमंलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाने DRI ने जप्त केले आहे. या प्रवाशाची अंगझडती करण्यात आली. यात प्रवाशाने घातलेल्या बुटात 14 सोन्याचे बार सापडले. बँकॉकहून मुंबईला जाणारे विमान TG 317 ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रवाशाला सोनं तस्करीसाठी कोणी दिले? या मागे कोणत्या टोळीचा हात आहे का? याचा तपास DRI चे अधिकारी करत आहेत. (Gold Smuggled)

मुंबईत DRI ला मोठे यश

मुंबईत अमंलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाने DRIच्या पथकाला मोठे यश मिळाले असून बँकॉकमधून मुंबई विमानतळावर एका प्रवाशाला सोने तस्करी प्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून अंगझडतीत प्रवाशाने घातलेल्या बुटात 14 सोन्याचे बार सापडले असून त्याचे एकूण वजन 6735.42 ग्रॅम एवढे होते. या सोन्याची साधारण किंमत 6.30 कोटी रुपये एवढी आहे. तस्करी केलेले हे सोने जप्त करण्यात आले आहे.प्रवाशाला तसेच खरेदीदाराला सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली.या प्रकरणीहे सोनं तस्करीसाठी कोणी दिले. या मागे कुठल्या टोळीचा हात आहे का ? याचा तपास DRI चे अधिकारी करत आहेत.

या घटनेमुळे मुंबई विमानतळावरुन सोनं तस्करीसाठी होणारे प्रयत्न पुन्हा एकदा उघड झाले आहेत. DRI च्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात तस्करी रोखण्यात यश मिळालं असून, या प्रकारामुळे तस्करीच्या पद्धती आणि त्यामागील रचनेचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

 

अनेकांचे whatasapp डाऊन, मेसेज जाईना, स्टेटसही अपलोड होईना !

जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि तातडीचा संदेशवहन डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअपमध्ये (Whatsapp) अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे समोर आले आहे. जगभरातील बहुतांश व्हॉट्सअप युजर्संना संदेशवहन करण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी आणि मेसेजिंग अॅप खोलताना अडचणी आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास युपीआय ट्रान्झेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाली होती. 57 मिनिटानंतर युपीआय पूर्ववत सुरू झाले. मात्र, आता, सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास व्हॉट्सअॅपमध्ये अडचण आल्याने नेटीझन्स युजर्सं (Netizens) काही काळ गोंधळल्याचं दिसून आलं. त्यामुळे, नेटीझन्स ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देत आहेत. 

हेही वाचा:

Nilesh Ghaywal : निलेश घायवळला कानाखाली मारणाऱ्या पैलवानाचा भयंकर रेकॉर्ड, खून करुन तुरुंगात गेला अन् तिकडे आणखी एकाला खल्लास केलं