Mumbai Municipal Corporation Elections : मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Corporation Elections) तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतीक्षा असणारी प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. 28 नोव्हेंबर 2024 ला अंतिम आरक्षण केले जाणार जाहीर, तर 14 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत सोडती वर हरकती सूचना मागवल्या जाणार आहेत. दरम्यान, 21 नोव्हेंबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्त निर्णय घेणार आहेत. 

Continues below advertisement

प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम खालील प्रमाणे:

आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेणे : 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 

आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : 6 नोव्हेंबर 2025 

Continues below advertisement

आरक्षणाची सोडत आणि निकाल जाहिर करणे : 11 नोव्हेंबर 2025 

प्रारुप आरक्षणाबाबत हरकती व सूचना मागवणे : 14 नोव्हेंबर 2025 

प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागवण्याची अंतिम तारीख : 20 नोव्हेंबर 2025 

हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्तांनी घ्यावयाचा निर्णय : 21 ते 27 नोव्हेंबर 2025 

अंतिम आरक्षण जाहीर करून वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : 28 नोव्हेंबर 2025 

राज्यातील 28 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणूका घेण्याचे आदेश दिलेत

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार राज्य निवडणू आयोगाने मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करता आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील 227 प्रभागांची आरक्षण सोडत येत्या 11 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार एसी व एसटी महिला व पुरुष, यांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. जनसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने याचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत सदस्यांमधून ६१ सदस्यांची लॉटरी ओबीसी प्रवर्गासाठी काढली जाईल. त्यातील महिला व पुरुष यांचे आरक्षण चिठ्ठया काढण्यात आल्यानंतर उर्वरीतांपैंकी महिलांचे आरक्षण काढून पुढील सर्व उर्वरीत हे प्रभाग हे खुल्या प्रवर्गात काढले काढले जातील.