एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

मुंबई पालिकेसाठी भाजपनं कंबर कसली! 150 जागा लढवण्याचं लक्ष्य, शिंदेच्या शिवसेनेला किती जागा? 

मुंबई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation) भाजपनं (BJP) अधिकाधिक जागा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असली तरी भाजपकडून 150 जागांचे लक्ष्य यंदाच्या महापालिकेत ठेवण्यात आले आहे.

Mumbai Municipal Corporation  : मुंबई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation) भाजपनं (BJP) अधिकाधिक जागा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असली तरी भाजपकडून 150 जागांचे लक्ष्य यंदाच्या महापालिकेत ठेवण्यात आले आहे. यंदा, महायुतीत भाजप मुंबई महापालिका लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या अनौपचारिक गप्पा दरम्यान स्पष्ट केलं आहे. मात्र, अधिकाधिक जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. सोबतच, उपमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 दरम्यान जागा दिल्या जाऊ शकतात अशी भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजप नेते जाहीररित्या बोलत नसले तरी कार्यकर्त्यांना भाजपने अधिक जागा लढवाव्यात असं वाटत असल्याचं नेत्यांकडून सांगितले जात आहे. 

केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी सुरु झाली आहे. दरम्यान, 150 जागा लढण्याचे टार्गेट डोळ्यासमोर असलेल्या भाजपची नेमकी रणनीती काय आहे याबाबतची माहिती पाहुयात. 

सेनेच्या ‘किल्ल्यात’, भाजप १५० पार!

शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून 65 ते  75 जागा सोडल्या जाणार, आहेत. सोबतच उमेदवार निवडीची जबाबदारी घेतली जाणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास सेनेला फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशात भाजपचे अधिकाधिक उमेदवार उपनगरात उतरवले जाणार आहेत. सोबतच, भाजप आमदार असलेल्या मुंबईतील मतदारसंघात देखील संपूर्ण जोर भाजपकडून लावला जाणार आहे. ज्यामध्ये कुलाबा, मलबार हिल, सायन, वडाळा या मतदारसंघाचा समावेश असणार आहे. 
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जिंकून येणे हेच निकष डोळ्यासमोर ठेवत जागावाटप होणार आहे. ज्या जागांवर अधिक पेच त्यासंदर्भात महायुतीचे नेते एकत्रित येत पेच सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. उमेदवारांची अदलाबदली महायुतीत विधानसभेत दिसली होती, तशीच रणनीती काही जागांवर होण्याची शक्यता आहे. 

ठाकरेंचे माजी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता

महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरेंचे माजी नगरसेवक फोडण्याचा देखील प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतो. दोन्ही भावांना मुंबईत फायदा होऊ नये यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले जाणार आहे. दरम्यान, भाजपच्या जागा वाटपाच्या चर्चेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी जागावाटपावरुन महायुतीची खिल्ली उडवली आहे. तर अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना भाजपचं ऐकावं लागणार अशी बोचरी टीका केली आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेकडून 100 हून अधिक जागा लढण्याचा निर्धार

एकीकडे भाजपनं 150 जागांवर तयारी सुरु केली असली तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून 100 हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केला आहे. सोबतच, शिंदेंकडून नुकताच दिल्ली दौरा करण्यात आला आहे. ज्यात समसमान वाटप मुंबई महापालिकेसाठी व्हावं अशी मागणी शिवसेनेच्या गोटातून होताना दिसत आहे. अशातच दिवाळीचे फटाके जरी फुटले असले तरी आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे. अशात, जागावाटपा आधीच महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेदाचे फटाके फुटताना दिसू शकतात. अशात, हा पेच महायुती कशी सोडवणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Cold Wave: विठुरायालाही थंडीची हुडहुडी, Pandharpur मध्ये देवासाठी उबदार रजाई आणि शाल.
Anvay Dravid U19 Selection : राहुल द्रविडचा मुलगा अन्वयची India Under-19 संघात निवड, वडिलांप्रमाणेच Wicketkeeper-Batsman
Tainted Leaders: 'ड्रग्स विकणाऱ्यांसाठी भाजपने मशीन आणलीय', Vijay Wadettiwar यांची टीका
Drugs Politics: 'ड्रग्ज तस्करीला राजाश्रय', Supriya Sule यांचे CM Fadnavis यांना पत्र
Palak Muchhal: गायिका पलक मुच्छलची विश्वविक्रमी कामगिरी, 3800 मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Suryakant Yewale: 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप, दरवेळी सेटिंग; अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका, तहसीलदार सूर्यकांत येवलेंंबाबत धक्कादायक खुलासे समोर
Gold Rates: लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात चढउतार कायम! आठवड्याभरात 4 हजारांची वाढ, आज तोळ्यामागे भाव किती?
Sangli News: दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
दलित महासंघाचे उत्तम मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडताच, हल्लेखोर शाहरूखचा सुद्धा कसा गेम झाला? सांगलीत दुहेरी थरकाप
Reduce Age Of Consent Under POCSO: सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
सहमतीने लैंगिक संबंध वय 18 वरून 16 करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात काय होणार? केंद्र सरकारचा कडाडून विरोध
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
Embed widget