Mumbai Mono Rail : काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल अडकून पडल्याची घटना घडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जवळपास अर्धा तास लागण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळं कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशामक दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळं कुणीही काळजी करु नये, घाबरुन जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काही काळजी करु नका, तुम्हाला काही होणार नाही, एकनाथ शिंदेंनी प्रवाशांना दिली धीर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोनो रेलमधील प्रवाशांशी संपर्क साधला. तुम्ही काही काळजी करु नका, आम्ही सर्व यंत्रणा लावत आहोत, तुम्हाला काही होणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच प्रवाशांना धीर देखील दिला आहे.
एकाप्रवाशाने काच फोडली
सुरुवातीला काच फोडून आतील प्रवाशांना बाहेर काढण्याचं नियोजन सुरू होतं. पण आत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे आतील प्रवाशांनी काचेवर हात मारण्यास सुरूवात केली. एका प्रवाशाने काच फोडली आणि त्यामुळे बाहेरची हवा आत गेल्याने प्रवाशांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला.
महत्वाच्या बातम्या: