मुंबईत मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, मनसे आक्रमक, पालिकेच्या कार्यालयावरच मध्यरात्री धरणे आंदोलन सुरु
मुंबई महानगर पालिकेकडून मराठी फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याच्या विरोधात मुंबईच्या दहिसरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
Mumbai MNS News : मुंबई महानगर पालिकेकडून (Mumbai Mahanagar Palika Election) मराठी फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याच्या विरोधात मुंबईच्या दहिसरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. बोरिवली लिंक रोडवर आवरा हॉटेलच्या शेजारी पालिकेच्या कार्यालयावर मध्यरात्री मनसेने धरणे आंदोलन केले आहे. मराठी माणसाच्या व्यवसायावर भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त बोरिवलीमध्येच कारवाई सुरु आहे. त्याचसोबत हा मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेने केली आहे.
पालिकेचे अधिकारी फक्त मराठी फेरीवालांच्या विरोधात कारवाई करतायेत
मनसे दहिसर विधानसभा विभाग अध्यक्ष किरण नकाशे कडून आरोप करण्यात आला आहे. पालिकेचे अधिकारी फक्त मराठी फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई करत आहेत असा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. दहिसर आणि बोरिवली परिसरामध्ये गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई केली जात नसल्यामुळे मनसे मुंबई मुंबई महानगरपालिका विरोधात निदर्शन करत आहे. जो कारवाई मराठी फेरीवाल्यांवर होत आहे तोच कारवाई गुजराती उत्तर भारतीय आणि इतर धर्मीय फेरीवाल्यांच्या वर कारवाई करा अशी मनसे कडून मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत मनसेची मागणी पालिका अधिकाऱ्यांनी मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असणार असल्याचा इशारा मनसेचा विभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी दिली आहे.
महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु
मुंबई आणि उपनगरात महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात, विशेषतः दादर, माटुंगा आणि कल्याण (मलंग रोड) सारख्या परिसरात धडक कारवाई सुरू आहे, ज्यामुळे अनेक टपऱ्या व स्टॉल्स हटवले जात आहेत. या कारवाईमुळे स्थानिक मराठी फेरीवाल्यांनी रोजगाराचा प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केली आहे, तर काही ठिकाणी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या आणि कामचुकारपणा करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे.
Ambernath: अंबरनाथ स्टेशन परिसर फेरीवाले मुक्त करा, अन्यथा...; अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक
























