Mumbai Megablock: आज मुंबईच्या दोन्ही लाइफ लाइनवर आज मेगाब्लॉकची रात्र असणार आहे. रात्रकालीन मेगाब्लॉक असल्याने शनिवार आणि रविवारी  रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यताय. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर शनिवारी रात्रीपासून सकाळपर्यंत मोठे मेगाब्लॉक घेतले जात आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान गर्डर बसवण्याच्या कामासाठी 13 तासांचा ब्लॉक असेल. तर मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणासाठी 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द होणार असून काही गाड्या धीम्या मार्गाने वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाची पूर्वयोजना करावी लागणार आहे..(Mumbai Railway Megablock)

Continues below advertisement


पश्चिम रेल्वे मार्गावर बदल


या ब्लॉक काळात पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील गर्डर उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. चर्चगेट लोकलचा प्रवास वांद्रे आणि दादर स्थानकांत समाप्त होईल. काही लोकल गाडय़ा वांद्रे व दादर स्थानकांतून विरार व बोरिवलीच्या परतीच्या प्रवासासाठी चालवण्यात येणार आहेत.


पश्चिम रेल्वे मार्गावर 13 तासांचा ब्लॉक


शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान विशेष ब्लॉक असणार आहे.



  • चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

  • चर्चगेट लोकलची सेवा वांद्रे आणि दादर स्थानकांत संपणार.

  • काही लोकल वांद्रे व दादरहून विरार आणि बोरिवलीच्या दिशेने सोडल्या जातील.

  • या ब्लॉकमुळे अनेक प्रवाशांना उशीर सहन करावा लागणार आहे.


मध्य रेल्वेवरही ब्लॉक


मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.या ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकलसेवा रद्द राहणार आहेत. तर ब्लॉक कालावधीमध्ये 59 लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. 47 मेल-एक्स्प्रेसवर या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबवण्यात येणार असून त्याच स्थानकावरून त्या परतीचा प्रवास सुरू करतील.


मध्य रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणासाठी तसेच प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



  • सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार.

  • या कालावधीत 59 लोकल आणि 3 मेल-एक्स्प्रेस रद्द.

  • 47 एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम; काही गाड्या दादर स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत.

  • परिणामी प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागेल.


 



हेही वाचा


Maharashtra Weather Update: मुंबईत 38.4 अंश! पुण्यासह कुठे किती पारा? मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात IMD चा अंदाज काय?