Mumbai Mayor Ritu Tawde : सध्या राज्यात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. तंत्र-मंत्र तसेच जादू करण्याचे आश्वासन देऊन महिलांना जाळ्यात ओढायचा. आतापर्यंत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे फोटो देखील त्याच्यासोबत व्हायरल झाले आहेत. अशातच मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे (Mumbai Mayor Ritu Tawde) यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गुरुदेवजींच्या चमत्कारामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असं वक्तव्य रितू तावडे यांनी केलं आहे. महावीर जयंती निमित्त बोरोवली कोरा केंद्र मैदानात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाल्या रितू तावडे?

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मला घशाची समस्या होती. मी गुरुजींना सांगितले की आवाजाची समस्या आहे. मी औषधं घेत आहे. परंतु काहीही फरक परत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी आशीर्वाद दिला आज मी स्पष्ट बोलत आहे. हा मोठा चमत्कार असल्याचे वक्तव्य महापौर रितू तावडे यांनी केलं आहे. आज माझा आवाज तुम्ही ऐकत आहात. खूपच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे असे रितू तावडे म्हणाल्या. भगवान महावीर यांचा अहिंसेचा मार्ग आपल्याला दिसत आहे.  दीड वर्षांपासून मी ज्या घशाच्या समस्येने त्रस्त होते, पण गुरुजींनी आशीर्वाद दिल्याने मी आज तुमच्यासमोर असं बोलू शकत असल्याचे तावडे म्हणाल्या. दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

 

Continues below advertisement

कोरा केंद्र हे मैदान नाही तर श्रद्धेचा संगम आहे. भगवान महावीर यांनी जगाला नव्हे तर स्वतः ला जिंकण्यात खरे शौर्य असल्याचे सांगितले होते. मुंबईची धडकन डबेवाले याठिकाणी आहेत. त्यांना ई बाईक्सचे वाटप केले जाणार असल्याचे रितू तावडे म्हणाल्या. तसेच 50 दिव्यांग बांधवांना ई ट्रायसिकल देण्यात येणार आहेत. 

महावीर जयंती निमित्त बोरोवली कोरा केंद्र मैदानात भगवान महावीर जन्म कल्याणक मोहत्सव साजरा होत आहे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य अतिथी असून, मुंबई महापौर रितू तावडे, आमदार व मंत्री मंगलप्रभात लोढा ,आमदार अमित साटम उपस्थित आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis on Ritu Tawde: गाडीवरच्या लाल दिव्यामुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे वादात, पण देवेंद्र फडणवीस भक्कमपणे पाठिशी उभे राहिले, म्हणाले...