Mumbai : मुंबईच्या मालाड पूर्वेत कुरार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मालाड पठाणवाडी परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे चारही बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या दाखल होऊन मुंबईच्या मालाड पठाणवाडी परिसरात काम शोधण्यासाठी आले होते. मालाड कुरार पोलिसांच्या ATC पथकाला त्यांच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक काम शोधण्यासाठी येत असल्याचं गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या अनुशंगाने कुरार पोलिसांच्या एटीसी पथकाने मालाड पठाणवाडी परिसरात धाडी टाकून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

Continues below advertisement

कुरार पोलिसांनी या आरोपीकडून बांगलादेशी नागरिक असल्याचा पुरावाही केला जप्त

अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नाव तुहीनुर जायनल सरदार वय 30 वर्षे, मोहम्मद अब्दुल मोमीन लतीफ सरदार वय 52 वर्षे, नजरुल इस्लाम स्वर अली बिश्वास वय 41 वर्षे, मोहम्मद इमामुल हक्क रहेमान वय 46 वर्षे असून हे सर्व आरोपी बांगलादेश मध्ये राहणारे आहेत. कुरार पोलिसांनी या आरोपीकडून बांगलादेशी नागरिक असल्याचा मोठा प्रमाणात पुरावा सुद्धा जप्त केली आहे. 

मुंबईच्या महापौर रितू तावडे कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशी विरोधात मोहीम हाती घेणार

महापौर पदाचा पदभार स्वीकारण्याआधीच आपण अनधिकृत बांगलादेशी विरोधात मोहीम हाती घेणार असल्याचं रितू तावडे यांनी सांगितलं होतं. आज महापौर रितू तावडे  या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशी विरोधात मोहीम हाती घेणार आहेत. आज मुंबई महापालिका मुख्यालयात याच विषयावर बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या हे मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशी विरोधात मोहीम चालवत आहेत. त्यासोबतच जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत आज महापौरांसोबत बैठकीत ते सुद्धा सहभागी होणार आहेत.  रोहिंग्या व बेकायदेशीर बांगलादेशींना मुंबईतून हटवणे हेच भाजप, शिवसेना (शिंदे) आणि आरपीआयचे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल. त्याकरता आम्ही डिजिटल सिस्टीम आणि एआयचा वापर करू. पदपथांवर अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांगलादेशींचे जात प्रमाणपत्र व बोगस आधार कार्ड शोधून त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात येईल, अशी घोषणा महापौरांनी केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी पाच हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut on Ritu Tawade: रितू तावडे म्हणाल्या, मुंबईतील बांगलादेशी रोहिंग्यांना बाहेर काढणार; आता संजय राऊतांनी पंतप्रधान अन् केंद्रीय अर्थमंत्र्यांचं नाव घेत नव्या महापौरांना सुनावलं!