Mumbai Local Mega block:  मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त फिरण्याचा किंवा कामानिमित्त रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर मुंबई लोकलचं (Mumbai Local) वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडाल. कारण देखभालीच्या कामासाठी मुंबईच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीएसएमटी वरुन पनवेलकडे जाणारी वाहतूक पाच तास म्हणजेच सकाळी 10.30 ते  दुपारी 3.45 वाजेपर्यंत बंद राहतील. 


देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात  येत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य (Central Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या कालावधीत प्रवाशांना ठाणे-वाशी मार्गावरून प्रवास करण्याची मुभा नागरिकांना असणार आहे.  


मध्य रेल्वेवर धीम्या गतीने सेवा सुरु राहणार 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25  ते दुपारी 03.10 या वेळेत  सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत  सुटणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. 


हार्बर मार्गावर असा असेल ब्लॉक 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून पनवेलकडे जाणारी अप आणि डाउन मार्गावरील सेवा 10.33 ते  दुपारी 03.49 या वेळेत पूर्णपणे ठप्प राहतील. तसेच पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील अप आणि डाऊन सेवा सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहेत. 


देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य (Central Railway), आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.  प्रवाशांना ठाणे-वाशी मार्गावरून प्रवास करण्याची मुभा असेल. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान फास्ट मार्गावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील फास्ट लोकल स्लो मार्गावरून वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरु राहिल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशीपर्यंत विशेष उपनगरीय गाड्या धावतील.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sameer Wankhede : आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची मागणी, समीर वानखेडे यांच्यावर CBI ची छापेमारी; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण