Iran Israel Conflict Affect In India : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरुअसलेल्या युद्धाचा (Iran Israel Conflict) आजचा सातवा दिवस आहे. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू असून पश्चिम आशियात परिस्थिती दिवसागणिकअधिक तणावपूर्ण होतअसल्याचेचित्र आहे. युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली असून आतापर्यंत 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असंसगळंअसतानायायुध्याचाथेटपरिणामजागतिकअर्थव्यवस्थेवरदेखीलहोतोय. दरम्यानआखातीदेशांमध्येमोठ्यासंख्येनेभारतीयनागरिकदेखीलकामासाठीवास्तव्य करतात. युध्दमुळे त्यांच्याजीवितालाधोकाअसतानाच, यायुद्धातमुंबईच्या कांदिवलीतील (Kandivali News) एमएचबी कॉलनीत राहणारे दिक्षित अमृतलाल सोलंकी (32) यांचा ओमानमधील मस्कत (Muscat) मध्येदुर्दैवीमृत्यूझाल्याचीमाहितीसमोरआलीआहे. मस्कतमध्येझालेल्या ड्रोन हल्ल्यात दिक्षित यांचा मृत्यू झाला.
Iran Israel Conflict : क्षेपणास्त्रांनी सज्ज ड्रोनचा हल्ला; सोलंकी कुटुंबीयावर दुःखाच्या डोंगर
पुढेआलेल्यामाहितीनुसार, 1 मार्च रोजी क्षेपणास्त्रांनी सज्ज ड्रोनने त्यांच्या जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात सोलंकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, दुसरीकडेआपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सोलंकी कुटुंबीयावर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे. सोलंकी हे MT MKD Vyom या टँकर जहाजावर क्रू-मेंबर म्हणून काम करत होते. हे जहाज सुमारे 59,000 मेट्रिक टन पेट्रोल वाहून नेत होते. हल्ल्यानंतर काही क्रू सदस्यांना 2 मार्च रोजी वाचवण्यात आले, मात्र सोलंकी यांचा त्यातदुर्दैवाने मृत्यू झालाय.
Kandivali News: आईच्या निधनानंतर घरचीजबाबदारी म्हणून पुन्हा जहाजावर रुजू झाले, अन्
मस्कटमधील भारतीय दूतावास (Embassy of India Muscat) यांनी या घटनेची माहिती कांदिवली पोलिसांना दिलीय. सोलंकी नुकतेच आईच्या निधनानंतर पुन्हा जहाजावर ड्युटीवर रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे. मयत दीक्षित सोळंकी यांच्या पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांना मिळावा, यासाठी त्यांच्या वडिलांकडून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे.
Iran Israel War : सोळंकी कुटुंबियांवर दुःखाच्या डोंगर, परिसरातहळहळ
दुसरीकडे, दीक्षित सोळंकी याआपल्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळतच कांदिवलीत त्याच्या कुटुंबीयांच्या शेजारी राहणारी आजीवर देखील दुःखाच्या डोंगर कोसळला आहे. शेजारी राहणारी सुगंधा परब या आजीचा दीक्षित सोळंकी हा मुलगा स्वतः ब्लड प्रेशर चेक करायचा, त्यासोबत शुगर आणि गोळ्या देखील द्यायचा. घरी येताना आणि बाहेर जाताना या आजी सोबत दीक्षित सोळंकी बोलून जायचाअसंत्यांनीसांगितलं. तीन महिन्यापूर्वी त्याची आई वारली, तेव्हा सुद्धा तो घरी आला होता. असेहीत्याम्हणाल्या. मात्र, आता दीक्षित सोळंकी यांच्या मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसोबत शेजारी राहणारी आजीवर देखील मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
