Mumbai Fire News : मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत गोकुळधाम परिसरात लक्ष चंडी इमातीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या सातव्या मजल्यावर एका  घरात ही मोठी आग लागली होती. या आगीमध्ये होरपळून एका महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे 

Continues below advertisement

आगीचं माहिती मिळतं अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल एका तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश मिळालं आहे. अचानक इमारतीमध्ये आग लागल्यावर इमारतीमध्ये धूर पसरल्यामुळे मोठ्या संख्येमध्ये इमारतीमध्ये राहणारे लोक अडकले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढले आहे.  या आगीमध्ये घर जळून खाक झाला आहे, तर एक महिला सुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आगीमध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे वय 72 वर्ष होते. इंदू तारकेश्वर सिंग असं या महिलेचं नाव होतं.

तुर्भे येथील रहिवाशी कॅालनीत एका घराला भीषण आग

तुर्भे येथील रहिवाशी कॅालनीत एका घराला सायंकाळी भीषण आग लागली होती. आगीचे कारण समजले नसले तरी या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घरातील कोणत्याही व्यक्ती जखमी झालेली नाही. अग्नीशमन दलाकडून त्वरीत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने आजूबाजूच्या घरांना झळ पोहोचली नाही. 

Continues below advertisement

भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग

 भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन भंगार गोदाम पूर्णतः जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोदामामध्ये कापड, प्लास्टिक आणि कागदाचा मोठा साठा होता. गोदामा शेजारी गवताला अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आली होती. ही आग हळूहळू पसरत जाऊन शेजारील भंगार गोदामांपर्यंत पोहोचली आणि काही वेळातच भीषण रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच खासगी टँकरच्या मदतीनेही आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन भंगार गोदाम पूर्णतः जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.