मुंबई : कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ उद्या मराठी एकीकरण समितीच्या (Marathi Ekikaran Samiti ) वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. जैन मुनीने दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीनं उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान, या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मराठी एकीकरण समितीने सोळ मीडियावर पोस्ट करत मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलं आहे. 

मराठी माणसांनी काहीच करायचं नाही का?

6 ऑगस्ट रोजी जैन आणि मारवाडी समाजाने पोलिसांनी धक्काबुक्की केली. सार्वत्रिक मालमत्तेच नुकसान केलं आहे. हजारो जण रस्त्यावर उतरले होते. सामान्य नागरिकांना त्यांनी वेठीस धरलं होतं असं मत मराठी एकीकरण समितीचे  गोवर्धन देशमख यांनी व्यक्त केले. यावेळी तोडफोड झाली होती, न्यायालयाचा अवमान केला तिथं मात्र गप्प आहेत असे मराठी एकीकरण समितीने म्हटले आहे. मराठी माणसांनी काहीच करायचं नाही? का सुरू आहे हे सर्व? असे सवाल मराठी एकीकरण समितीच्या वतीनं करण्यात आला आहे. 

जैन मुनी शस्त्र घेण्याची भाषा करतायेत

जैन मुनी शस्त्र घेण्याची भाषा करत आहेत. मोर्चा काढण्याची भूमिका घेत आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची भाषा करत आहेत. कोर्टाचा अवमान करत आहे. यावर पोलिसांनी काय भूमिका घेतली. काय कारवाई केलीय का? राज्य वाऱ्यावर सोडलंय का? शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे का? हे विचारण्यासाठी आम्ही उद्या दादरमध्ये येत असणार असल्याचे गोवर्धन देशमख यांनी म्हटलं आहे. मराठी माणसांची मुस्कटदाबी या राज्यात का सुरु आहे? असा सवाल मराठी एकिकरण समितीच्या वतीनं विचारण्यात आला आहे. 6 तारखेला जैन, गुजराती मारवाड्यांनी हजारोंच्या संख्येनं मोर्चे काढले, त्यावेळी त्यांना नोटीसा दिल्या होत्या का? असा सवाल  गोवर्धन देशमख यांनी केला आहे. 

मराठी एकीकरण समितीही आता जैन समाजाच्या अवाजवी मागणीविरोधात आक्रमक 

मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झाला आहे. अनेकांनी न्याय़ालयाच्या निर्णयाविरोधात जात रस्त्यावर उतरून कबुतरखाना सुरु ठेवण्यासाठी आंदोलन केलं. तर दुसरीकडे मराठी एकीकरण समितीही आता जैन समाजाच्या अवाजवी मागणीविरोधात आक्रमक झालीय. कबुतरखान्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजानं दिलेला असताना त्याच दिवशी म्हणजे 13 ऑगस्टला न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती आंदोलन करणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Dadar Kabutar Khana: कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार, मनीषा कायंदे भडकल्या, म्हणाल्या, 'यांचा इगो हर्ट...'