Mumbai Crime News : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. बँकॉकहून दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली आहे. प्रवासी ट्रॉली बॅगेत लपवून या दुर्मिळ वन्यजीव प्राण्याची तस्करी करत होता. वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणाऱ्या प्रवाशावर कस्टम विभागाने वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अ‍ॅनाकोंडा जातीच्या सपासह विविध जातीच्या प्राण्यांची तस्करी सुरु होती. 

Continues below advertisement

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अ‍ॅनाकोंडा साप जप्त

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अ‍ॅनाकोंडा साप जप्त करण्यात आले आहेत. थायलंड वरुन अ‍ॅनाकोंडा सापाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. हे चार साप जप्त करण्यात आले आहेत. तब्बल 154 परदेशी प्राण्यांची तस्करी सुरू होती. ईग्वाना, कासव कॉर्न स्नेक तसेच सरड्याच्या अनेक प्रजातींचा यामध्ये समावेश होता. झरीन शेख नावाच्या महिलेने तस्करी केली होती. या प्रकरणी कस्टम्स विभागाने अटक केली आहे. 

कोणकोणत्या प्रण्यांची तस्करी सुरु होती?

कॉर्न साप (Lampropeltis californiae) – 66 नगहॉगनोज साप (Heterodon platirhinos) – 31 नगयलो अ‍ॅनाकोंडा (Eunectes notaeus) – 4 नगयलो फूटेड कासव (Chelonoidis denticulata) – 3 नगरेड फूटेड कासव (Chelonoidis carbonarias) – 2 नगअल्बिनो स्नॅपिंग कासव (Chelydra serpentina) – 3 नगआर्माडिलो सरडा (Ouroborus cataphractus) – 26 नगइग्वाना (Iguana spp.) – 2 नगवॉटर मॉनिटर सरडा (Varanus salvator) – 4 नगबिअर्डेड ड्रॅगन (Pogona vitticeps) – 11 नगरॅकून (Procyon lotor) – 2 नग

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Bhandara Crime: कुंपणानेच शेत खाल्लं! वनाधिकाऱ्याचा रजेचा अर्ज करून चक्क वाळू तस्करी; पोलिसांच्या वाहनाला अडथळा आणून वाळूचा टीप्पर पळवला