Mumbai Crime News : शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे दुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवून मोठ्या संख्येमध्ये नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींना पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
आरोपी वेगवेगळ्या नावाने बोगस बँक खाती उघडून त्याद्वारे फसवणूक करत असल्याचे उघड
मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी शेअर मार्केटमध्ये पैसा दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून मुंबईकरांची लूट करणारी टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा परिसरात राहणारा एका व्यक्तीला ट्रेडिंग च्या नावाने 5 लाख 72 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. फिर्यादी राजू छिब्बेर यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, पैसा डबल करून देतो असे सांगून रक्कम उकळली होती. तांत्रिक तपासात संशयितांचे लोकेशन धारावी परिसरात आढळल्याने पोलिसांनी मोहम्मद अकील शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या माहितीवरून विजयकुमार पटेल, राजेंद्र विधाते आणि अक्षय कणसे यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी वेगवेगळ्या नावाने बोगस बँक खाती उघडून त्याद्वारे फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
अलिकडच्या काळामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करुन भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या खळबळजनक घटना समोर येत आहेत. अनेकजण अमिष दाखवून फसवणू करत आहेत. या लोकांच्या अमिषाला बळी पडून अनेकजण आयुष्यभराची कमाई या देतात, परिणामी मोठे आर्थिक नुकासन होते. सातत्याने अशा घडताना दिसत आहेत. त्यामुळं नागरिकांनी पैशांची गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. पैशांची गुंतवणूक करताना दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण ठेवणारा किंवा गुंतवणूक करणारा पैसा सुरक्षीत ठिकाणी जठेवत आहोत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी गुंतवणूक केलेल्या पैशांवर आपल्याला संबधित बँक, संस्था, यांच्याकडून किती परतावा मिळतो, याबाबतची खात्री करणं गरजेचे असते, अन्यथा फटका बसू शकतो.
महत्वाच्या बातम्या: